30 May 2023 4:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Calculator | PPF कॅल्क्युलेटर सांगेल 1000 गुंतवून 18 लाख परतावा कसा मिळवायचा, पैसा वाढवणारी माहिती  Loan Recovery Rules | आता तुमचे बॅंकेचे EMI थकले तरी डोन्टवरी, कर्जदाराला आरबीआयने दिलेले महत्वाचे अधिकार लक्षात ठेवा Investment Tips | या सरकारी योजनेत दररोज 45 रुपये गुंतवल्यास 25 लाख रुपये परतावा मिळेल, अधिक जाणून घ्या Multiple Bank Accounts | बँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट्स असतील तर आधी ही खबरदारी घ्या, अन्यथा... Plan 475 | ममता-नितीश यांचा प्लॅन 475 काय आहे? 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने 52 जागा जिंकल्या होत्या तर 209 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते Triveni Engineering Share Price | मागील 5 दिवसात त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स तेजीत, नेमके कारण काय? Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर स्टर्लिंग टूल्स शेअरचा गुंतवणूकदारांना 105% परतावा, आता 100% डिव्हीडंड देणार, स्टॉक डिटेल्स पहा
x

PM Awas Yojana | मोदींनी महिलेला प्रधानमंत्री योजनाच्या लाभाबद्दल विचारलं आणि उत्तराने झाली पोलखोल

PM Awas Yojana

नवी दिल्ली, ०५ ऑक्टोबर | भारताच्या प्रगतीत आधुनिक तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वतः बरोबर देशाच्या प्रगतीला चालना द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लखनौ येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यूपीतीला ४७३७ कोटींच्या ७५ प्रकल्पांचे आणि तीन दिवसीय राष्ट्रीय ‘न्यू अर्बन इंडिया कॉन्क्लेव्ह’चे उद्घाटन (PM Awas Yojana) त्यांनी केले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय-यू) घरांच्या चाव्या डिजिटल पद्धतीने उत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यांमधील ७५ हजार लाभार्थींना दिल्या. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नागरी उड्डाण मंत्री ह्ररदीप पुरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

PM Awas Yojana. PM Modi inaugurated 75 projects worth Rs 4,737 crore to UPT and a three-day national ‘New Urban India Conclave’. Under Pradhan Mantri Awas Yojana (PMAY-U), house keys were digitally distributed to 75,000 beneficiaries in 75 districts of Uttar Pradesh :

पंतप्रधान मोदी यांनी या प्रसंगी पंतप्रधान आवास योजनेच्या कामाची माहिती दिली. गेल्या सात वर्षात देशात १ कोटी ३० हजार घरांचे निर्माण केले आहे. यापूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात केवळ १३ लाख घरे बांधण्यात आली होती. उत्तर प्रदेशात त्यावेळच्या सरकारच्या काळात १८ हजार घरांना मंजुरी देण्यात आली. पण, १८ देखील बांधली नव्हती. योगी सरकार सत्तेवर आल्यावर ९ लाख घरांची निर्मिती करण्यात आली. १४ लाख घरांचे बांधकाम सुरु आहे. विशेष म्हणजे या ९ लाख घरे गरीब लाभार्थींना देण्यात सुद्धा आली आहेत.

ते म्हणाले, देशातील झोपडपट्टीत राहणाऱ्या ३५ कोटी लोकांपैकी ३ कोटी लोक हे लखपती बनले आहेत. कारण त्यांना पक्की घरे सरकारने बांधून दिली आहेत. पंतप्रधान आवास योजनेतील लोकांच्या खात्यात थेट अनुदानाची रक्कम जमा होते. त्यांना वीज,पाणी, गॅस आदी सुविधा देण्याचे महत्वाचे कार्य करण्यात आले आहे. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या लोकांची बँक खाती काढण्यात आल्यामुळे डिजिटल पेमेंटला मोठी चालना मिळाली आहे. तब्बल ६ लाखांवर व्यवहार या माध्यमातून झाले आहेत.

सरकार देशाचा आठही बाजूने विकास करत आहे. शहरे कचरामुक्त करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, घरबांधणी, रेरा कायद्यामुळे व्यवहारात आलेला पारदर्शकपणा या व अशा वेगवेगळ्या प्रकलपामुळे जनतेचे जीवनमान अधिक सोपे करण्याचे सरकारचे अखंड प्रयत्न सुरु आहेत. विविध प्रकल्पातून रोजगाराची नव्या संधी निर्माण होत आहेत.त्यात मेट्रो, बांधकाम आणि रस्त्याची निर्मितीचा समावेश आहे. गाव तेथे वीज हा उपक्रम सरकारने राबविला आहे. एलईडी लाइटचा वापर वाढविण्यास प्रोत्साहन दिल्यामुळे त्याचे उत्पादन वाढले. पूर्वी ३०० रुपयांना मिळणारा एलईडी दिवा आता ६० रुपयांत उपलब्ध होत आहे. तसेच या दिव्यांचा वापर वाढल्याने विजेचे बिलही कमी येण्यास आणि विजेची मोठी बचत होण्यास सुरुवात झाली आहे.

यावेळी घडलेल्या एका प्रकाराने मोदी सरकारची पोलखोलच झाली असे म्हणाले लागेल. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका महिलेला विचारलं की, ‘तुम्हाला प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा काही लाभ मिळाला आहे का? त्यावर महिलेले उत्तर दिलं ‘नाही! काहीच नाही मिळालं’.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: PM Awas Yojana house keys were digitally distributed to 75 000 beneficiaries in Uttar Pradesh.

हॅशटॅग्स

#PMAwasYojana(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x