26 September 2020 7:51 PM
अँप डाउनलोड

देशात मागील ५ वर्षापासून 'सूपर इमर्जन्सी': ममता बॅनर्जी

Narendra Modi, Amit Shah, mamta banarjee

नवी दिल्ली : भारतात ४४ वर्षापूर्वी म्हणजे २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती. आजच्या या आणीबाणी घटनेला प्रत्येक जण आपल्यापरिने ट्विट करत भाष्य करत आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आणीबाणीच्या या घटनेवर ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून ममता यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

ममता बॅनर्जी यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, आजच्या दिवशी देशात आणीबाणी घोषित केली होती, परंतु देहात मागील ५ वर्षात सूपर इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. आपल्याला इतिहासाकडून खूप काही शिकणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या संस्थांनांचे रक्षण करण्यासाठी लढण्याची इच्छा हवी असं ममतांनी सा्ंगितले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात प्रचंड तणाव वाढलेला आहे. ममता बॅनर्जी यांनी उघडपणे आक्रमक पवित्रा घेत मोदी सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यालाही ममता बॅनर्जी यांनी गैरहजेरी लावली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दररोज हिंसक घटना घडत असून कोणाचा ना कोणाचा जीव देखील जात आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन निर्दयीपणे हिंसा करत एकमेकांवर जीवघेणे हल्ले करत आहेत. अनेक कार्यकर्त्यांची हत्याही झाली आहे.

त्यामुळे देशातील आणीबाणीला ४४ वर्ष उलटली असली तरी आज मोदी आणि अमित शहांच्या राजवटीत खरी आणीबाणी आहे आणि ती मागील ५ वर्षांपासून देशात आहे अशी खरमरीत टीका सध्या विरोधक करताना पाहायला मिळत आहे.

या संदर्भात काय म्हणाल्या आहेत ममता बॅनर्जी नेमकं?

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x