13 May 2021 9:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

5 दहशतवादी अटकेत, प्रजासत्ताक दिनी घातपात करण्याचा कट उधळला

Terrorist, 26 January

श्रीनगर : जम्मू काश्मीर पोलिसांनी प्रजासत्ताकदिनाच्या आधी मोठी कारवाई केली. जैश ए मोहम्मदच्या ५ दहशतवाद्यांना श्रीनगरमधून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेले दहशतवादी घातपाताच्या तयारीत होते. पोलिसांनी त्यांचा कट उधळून लावला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचे मोठे मोड्यूल गुरुवारी सायंकाळी हजरतबलजवळ या दहशतवाद्यांना अटक करून उध्वस्त केले आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, अटक दहशतवादी २६ जानेवारीच्या सुमारास श्रीनगरमध्ये आयईडी हल्ल्याचा कट रचत होते. या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.

अटक केलेल्या या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी स्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या, हातबॉम्ब आणि इतर सामुग्री जप्त केली आहे. प्रजासत्ताक दिनी काश्मीरमध्ये मोठा घातपात करण्याचा यांचा डाव होता.

 

Web Title:  Terrorist attack plotted 26 January program busted explosive seized five terrorists by security forces.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1531)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x