13 May 2024 7:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

केंद्राच्या निर्णयानंतर भारतात कोरोना रुग्णांवर वापरणार नवं औषध

Government of India, Allows, Dexamethasone, Covid 19 Patients

नवी दिल्ली २७ जून: कोरोना व्हायरसमुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर ‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने करोना व्हायरसच्या उपचारपद्धतीमध्येही काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन (Dexamethasone) औषध वापरायला परवानगी दिली आहे. कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी हे औषध वापरलं जाणार आहे.

सर्वप्रथम यूकेमधील संशोधनात डेक्सामेथासोन औषध करोनावर प्रभावी ठरत असल्याचे समोर आले. डेक्सामेथासोन हे औषध प्रामुख्याने संधीवात, अ‍ॅलर्जी, दमा आणि काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपचारासाठी वापरले जाते. हे औषध करोनावर सुद्धा प्रभावी ठरत आहे. डेक्सामेथासोन हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध आहे. करोनामुळे गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात यावे, असा WHO ने सल्ला दिला होता.

दुसऱ्या बाजूला जुलै- ऑगस्टमध्ये कोरोना साथीचा विस्फोट होण्याची शक्यता आहे, महाराष्ट्रात COVID-19 चे रुग्ण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टर आणि ICU बेड्सची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

तर “सध्या डेक्सामेथासोन औषधासंबंधी प्राथमिक माहिती उपलब्ध आहे. हे औषध करोना रुग्णांना लागू पडतेय, ही दिलासा देणारी बाब आहे. आता वेगाने या औषधाचे उत्पादन वाढवून जगभरात वितरण करणे आवश्यक आहे. खासकरुन ज्या भागांमध्ये जास्त गरज आहे, तिथे हे औषध पोहोचवण्याची गरज आहे” असे टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस म्हणाले. ते जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक आहेत.

 

News English Summary: The Union Ministry of Health has approved the use of the drug ‘Dexamethasone’ in patients suffering from corona virus. The Ministry of Health has also made some changes in the treatment of corona virus.

News English Title: Government of India Allows Use Of Dexamethasone For Moderate Severe Cases News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x