30 April 2025 8:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

अमेरिकेतील विद्यापीठाचा अनुमान खरा ठरण्याच्या दिशेने | देशात गेल्या २४ तासांत ३२९३ रुग्णांचा मृत्यू

India corona pandemic

नवी दिल्ली, २८ एप्रिल | कोरोनाने गेल्या एक वर्षात दोन लाखांपेक्षा जास्त लोक आपल्यातून हिरावून घेतले. मंगळवारी देशात सर्वाधिक ३,२८५ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारी आकडेवारीत २,०१,१६५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. तथापि, खरे आकडे यापेक्षाही खूप जास्त आहेत. त्याचबरोबर देशात प्रथमच एका दिवसात २.६२ लाख लोकांनी कोरोनावर मात केली ही दिलासादायक बातमीही आली. आतापर्यंत १.४८ कोटी लोक कोरोनातून बरे झाले आहेत.

दरम्यान, मंगळवारी ३,६२,७५७ नव्या रुग्णांसह एकूण रुग्णांचा आकडा १.७९ कोटींवर गेला. चिंतेची बाब म्हणजे बरे होण्याचा दर घसरून ८२.३% झाला आहे, हा दर याच वर्षी १७ फेब्रुवारीला ९७.३३ टक्के होता. भारतात कोरोनामुळे पहिला मृत्यू गेल्या वर्षी १२ मार्चला झाला होता. महामारीच्या दुसऱ्या लाटेत आकडे रोज नवा विक्रम घडवत आहेत. १० सर्वाधिक प्रभावित राज्यांतच एप्रिलमध्ये मृतांची संख्या ५ पट वाढली आहे.

महाराष्ट्रात मंगळवारी एकाच दिवसात विक्रमी ८९५ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६,१७९ लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एका दिवसात ३८१ आणि यूपीत २६४ जणांचा मृत्यू झाला. अमेरिका, ब्राझील, मेक्सिकोनंतर आता भारत दोन लाखांपेक्षा जास्त मृत्यू झालेला चौथा देश आहे. देशात सध्याच्या घडीला २९ लाख ७८ हजार ७०९ अॅक्टिव्ह रुग्ण असून १४ कोटी ७८ लाख २७ हजार ३६७ जणांचं लसीकरण झालं आहे.

दरम्यान, देशात मे महिन्याच्या मध्यावधीत दररोज ५ हजाराहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने ((IHME) चिंता वाढवणारा इशारा दिला आहे.

इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने कोविड-१९ प्रोजेक्शन शिर्षकाखाली एक अभ्यास केला. या अभ्यासाचा अहवाल १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला असून, अभ्यासात दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यात लसीकरणावर आशा व्यक्त करण्यात आलेली आहे. करोनाच्या आपत्तीमुळे भारतातील परिस्थिती पुढील काही आठवड्यात आणखी वाईट होईल, असा इशारा इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने अभ्यासाच्या आधारे दिला आहे. तज्ज्ञांनी भारतातील सध्याचा संसर्गाची आणि मृत्यू सरासरी यांचाही अभ्यास केला आहे.

इन्स्टिट्यूटने चालू वर्षात भारतात करोना मृत्यूसंख्या शिखरावर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. १० मे रोजी भारतात ५ हजार ६०० जणांचा करोनामुळे मृत्यूची होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, १२ एप्रिल ते १ ऑगस्ट या कालावधीत देशात ३ लाख २९ हजार जणांचा करोनामुळे मृत्यू होऊ शकतो. तसेच जुलै अखेरीपर्यंत एकूण ६ लाख ६५ हजार मृत्यू होऊ शकतात, असंही इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने अभ्यासात म्हटलं आहे.

 

News English Summary: Corona has deprived more than two million people of us in the last one year. The highest death toll in the country was 3,285 on Tuesday, with government figures showing 2,01,165 deaths due to corona. However, the real figures are much higher than this. At the same time, for the first time in the country, 2.62 lakh people overcame Corona in a single day. So far, 1.48 crore people have been cured of corona.

News English Title: The highest death toll in the country was 3285 on Tuesday corona pandemic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या