2 May 2025 11:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

कोरोनिल'ची जाहिरात थांबवा, केंद्राचा पतंजलीला दणका

The Ministry of AYUSH, Patanjali company, coronil drug

नवी दिल्ली, २३ जून : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसविरोधातील औषध (coronavirus medicine) आणि लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात पतंजलीने कोरोनाव्हायरसविरोधात औषध शोधून काढलं आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनिल (coronil) हे औषध आज लाँच केलं. यामुळे कोरोना रुग्ण सात दिवसांत बरा होत असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला. आता केंद्र सरकारने पतंजलीला (patanjali) झटका दिला आहे. कोरोनिलची जाहिरात थांबवावी, आधी सविस्तर माहिती केंद्र सरकारला द्यावी असे निर्देश पतंजलीला देण्यात आले आहेत.

हे औषध बाजारात आणण्यात आल्यानंतर पतंजलीनं त्यांची जाहिरात करण्यासही सुरूवात केली आहे. हे औषध घरपोच पोहोचवण्यासाठी अँप आणण्याची तयारी पतंजलीकडून सुरू असतानाच केंद्र सरकारकडून पतंजलीला मोठा धक्का बसला आहे. केंद्र सरकारनं पतंजलीला करोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले आहेत. “या औषधाची चाचणी होईपर्यंत जाहिरात थांबवण्यात यावी, असं केंद्र सरकारनं पतंजलीला दिलेल्या आदेशात म्हटलं आहे.

संपूर्ण सायंटिफिक डॉक्यूमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनावरील एविडेंस बेस असलेलं पहिलं आयुर्वेदिक औषध आहे, असं रामदेव बाबा यांनी सांगितले. पतंजलीच्या मते, हा रिसर्च संयुक्तपणे पतंजली रिसर्च इंस्टीट्यूट (पीआरआय) हरिद्वार, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस (NIMS) जयपूरने केला आहे. या औषधाची निर्मिती दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वारकडून केली जात आहे.

 

News English Summary: Baba Ramdev launched the drug Coronil today. Baba Ramdev claimed that the corona patient was cured in seven days. Now the central government has dealt a blow to Patanjali. Patanjali has been instructed to stop the advertisement of Coronil and give detailed information to the Central Government first.

News English Title: The Ministry of AYUSH has also ordered the Patanjali company not to advertise the coronil drug until it is properly tested News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या