30 April 2025 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

मानहानी प्रकरणात अमित शहांना कोर्टाचं समन्स येताच अभिषेक बॅनर्जीच्या घरी CBI?

CBI, Abhishek Bannerjee, scam case

कोलकत्ता, २१ फेब्रुवारी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलेलं आहे. भाजपा व तृणमूल काँग्रेसमधील राजकीय वाद शिगेला पोहचल्याचं दिसत असताना, आता केंद्रीय तपास यंत्रणेच्या (सीबीआय) रडारावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी आल्याचे दिसत आहे.

अभिषेक बॅनर्जींची पत्नी व ममता बॅनर्जींची सून रूजीरी बॅनर्जी यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. याचबरोबर सीबीआयकडून अभिषेक बॅनर्जींना समन्स देखील जारी करण्यात आलं आहे, त्यानुसार त्यांना २४ तासांच्या आथ चौकशीसाठी हजर होण्यास सांगण्यात आलेलं आहे.

तत्पूर्वी तृणमूल काँग्रेसचे संसद सदस्य अभिषेक बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात प.बंगालमधील एका न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना समन्स जारी केले असून, २२ फेब्रुवारी रोजी व्यक्तिगत अथवा वकिलाच्या माध्यमातून हजर होण्यास सांगितले आहे. ११ ऑगस्ट, २०१८ रोजी कोलकाताच्या मेयो रोडवर आयोजित भाजपच्या एका रॅलीत अमित शहा यांनी तृणमूल संसद सदस्यांविरुद्ध काही अपमानकारक वक्तव्ये केली होती, असा आरोप आहे. त्यानंतरच त्यांच्या कुटुंबियांच्या मागे CBI चौकशी लावण्यात आल्याचे आरोप सुरु झाले आहेत.

 

News English Summary: On 19 Feb,a court in Kolkata summoned Amit Shah in a defamation case filed by Abhishek Banerjee for comments made by the former at a rally in 2018.Shah or his representative have been asked to appear in court on 22 Feb. Today CBI reached Bannerjee’s house said Prashant Bhushan.

News English Title: Today CBI reached Abhishek Bannerjee house on scam case news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या