 
						Free Life Insurance | जेव्हा आपण कोणत्याही प्रकारची जीवन विमा पॉलिसी, वैद्यकीय पॉलिसी, प्रवास किंवा इतर पॉलिसी घेतो, तेव्हा आपल्याला निश्चित कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागतो. जीवन विमा पॉलिसीबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमा धारकासोबत कोणतीही दुर्दैवी घटना घडली तर पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. पण, तुम्हाला माहीत नसेल की काही जीवन विमा कवच आहेत, जे मोफत उपलब्ध आहेत मात्र सामान्य लोकांना त्याबद्दल जास्त माहिती नाही. सहसा याला सारख्या मोफत जीवन विमा योजनेला “अॅड ऑन कव्हर्स” म्हणतात. हे लहान विमा संरक्षण प्रतिकूल परिस्थितीत खूप उपयोगी पडतात.
7 लाखांपर्यंत कव्हर :
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये नोंदणी असलेल्या कर्मचार्यांना लाइफ इन्शुरन्स कव्हरची सुविधा मिळते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO चे सर्व सदस्य कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजना 1976 अंतर्गत त्यात समाविष्ट असतात. या स्कीममध्ये कर्मचारीसाठी मालकाच्या म्हणजेच कंपनीच्या वतीने प्रीमियम म्हणून थोडी रक्कम जमा केली जाते. या अंतर्गत, EPFO सदस्यांना 2.5 लाख ते 7 लाख रुपयांपर्यंत जीवन विमा विमा संरक्षण देखील दिले जाते. या जीवन विमा योजनेत कमाल इन्शुरन्स कव्हर मर्यादा 7 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
EDLI योजनेचा फायदा :
एखाद्या कर्मचाऱ्याचा आजारपणाने, अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास सदस्य कर्मचाऱ्याच्या नामनिर्देशित व्यक्तीच्या वतीने EDLI योजने अंतर्गत दावा केला जाऊ शकतो. यामध्ये एकरकमी पेमेंट सुविधा देखील उपलब्ध आहे. सध्या एखादा कर्मचारी जर मृत्यूपूर्वी 12 महिन्यांच्या आत एखाद्या कंपनीत काम करत असेल तर त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबालाही ईडीएलआय योजनेचा लाभ मिळणार आहे.
डेबिट/क्रेडिट कार्डवर विमा :
भारतात काम करणाऱ्या सर्व सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील बँकाच्या खातेधारकांना त्यांच्या डेबिट कार्डवर विमा संरक्षण प्रदान केले जाते. या जीवन विमा कवचमध्ये वैयक्तिक अपघात कव्हर, खरेदी संरक्षण कवच आणि कायमस्वरूपी अपंगत्व कव्हर यासह विविध प्रकारचे जीवन विमा कव्हर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे जीवन विमा कव्हर 10 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. दुसरीकडे, ग्राहकाला त्याच्याकडे असलेल्या क्रेडिट कार्डच्या प्रकारावर आणि त्याच्या सेवा प्रदात्याद्वारे ऑफर केलेल्या क्रेडिट कार्ड मर्यादेनुसार विमा संरक्षण दिले जाते. क्रेडिट कार्डवर साधारणपणे 4 प्रकारचे जीवन विमा कव्हरेज दिले जाते. यामध्ये मुख्यतः अपघात विमा, प्रवास विमा, क्रेडिट विमा आणि खरेदी विमा उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या बँकांच्या क्रेडिट कार्डवरील जीवन विमा कव्हरेजची उपलब्ध मर्यादा वेगवेगळी असते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, क्रेडिट कार्ड सक्रिय असतानाच तुम्हाला त्यावर विमा संरक्षण उपलब्ध राहील.
SIP वर देखील विमा संरक्षण :
तुमचा नक्कीच विश्वास बसणार नाही की, अनेक म्युचुअल फंड हाऊसेस आपल्या स्कीममध्ये SIP वर देखील जीवन विमा संरक्षण कवच उपलब्ध करून देते. अनेक कंपन्यांच्या म्युचुअल फंड SIP मध्ये जीवन विमा कवचही देण्यात येतो. सहसा या प्रकारच्या जीवन विमा योजनेला SIP प्लस विमा उत्पादन असे म्हणतात. प्रत्येक कंपनी हे विमा संरक्षण कवच आपल्या निधीसह वेगवेगळ्या नावाने ग्राहकांना उपलब्ध करून देते. उदाहरणार्थ, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाची ‘SIP Plus’, आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाची ‘सेंच्युरी SIP’, PGIM इंडिया म्युच्युअल फंडाची ‘स्मार्ट SIP’ आणि निप्पॉन इंडियाची ‘SIP विमा’ योजना, या नावाने ग्राहकांना उपलब्ध करून दिले जातात.
वास्तविक, या जीवन विमा योजनेत 18 ते 51 वर्षे वयोगटातील गुंतवणूकदार एसआयपी प्लस विमा योजनेसाठी पात्र असतात. तथापि, जीवन विमा कव्हरेजमध्ये वयोमर्यादा वेगवेगळ्या कंपनीनुसार बदलते. काही म्युचअल फंडांमध्ये हे जीवन विमा कव्हरेज ग्राहकांना वयाच्या 60 वर्षापर्यंत उपलब्ध करून दिले जाते. प्रकारच्या म्युचुअल फंड SIP मध्ये कमाल 50 लाख रुपयांपर्यंतचे जीवन विमा संरक्षण देण्यात आले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		