20 May 2024 7:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Punjab and Sind Bank Share Price | सरकारी बँकेचा शेअर 30 रुपयाचा, 3 महिन्यांत या 104% परतावा, स्टॉक डिटेल्स पहा

Punjab and Sind Bank Share Price

Punjab and Sind Bank Share Price | 2022 या वर्षात शेअर बाजारामध्ये कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली आहे. आणि याचा परिणाम अनेक कंपनीच्या शेअर्सवर झाला आहे. गेल्या 9 आठवड्यांपासून सतत तेजीत धावणारे आणि अल्पावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करणाऱ्या PSU बँकेचे शेअर्स 3.77 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करतोय त्याचे नाव, ‘पंजाब अँड सिंध बँक’ आहे. आज हा स्टॉक 3.77 टक्के घसरणीसह 30.60 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Punjab and Sind Bank Share Price | Punjab and Sind Bank Stock Price | BSE 533295 | NSE PSB)

पंजाब अँड सिंध बँकेचे शेअर आज 30.60 रुपये किमतीवर लाल निशाणीवर बंद झाले. या PSU बँकेचा शेअर 15 डिसेंबर 2022 रोजी 44.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. आणि 21 जून 2022 रोजी हा शेअर 13 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता.

पंजाब अँड सिंध बँकेच्या शेअरमध्ये सकारात्मक वाढ झाल्यास बँकेचा व्यवसाय दोन लाख कोटींच्या पार जाईल, असा विश्वास तंद्यानी व्यक्त केला आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक स्वरूप कुमार साहा यांनी माहिती दिली आहे की, चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या ऑक्टोबर-डिसेंबर हा तिमाहीत P&S बँकेचे कर्ज 17 टक्क्यांच्या वाढीसह 78,049 कोटी रुपये झाले आहे. बँकेचे इतर प्रमुख मापदंड उदाहरणार्थ मालमत्ता गुणवत्ता देखील नियंत्रणात असल्याची माहिती स्वरूप कुमार यांनी दिली आहे. डिसेंबर तिमाही अखेर बँकेचे चालू खाते आणि बचत खाते म्हणजेच CASA प्रमाण 11.33 टक्क्यांनी वाढून 36,460 कोटी रुपयेवर गेले आहे.

शेअरची कामगिरी :
पंजाब अँड सिंध बँकेच्या शेअरनी 2022 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 5 टक्क्यांहून अधिक नकारात्मक परतावा दिला आहे. त्याच वेळी मागील सहा महिन्यांत या PSU बँकिग स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 118 टक्क्यांचा बंपर परतावा कमावून दिला होता. मागील 3 महिन्यांत या बँकिंग मध्ये पैसे लावणाऱ्या लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 104 टक्के वाढले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Punjab and Sind Bank Share Price 533295 PSB in focus check details on 10 January 2023.

हॅशटॅग्स

Bank Share(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x