9 May 2025 2:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअरची ही असेल पुढची टार्गेट, या अपडेटचा होणार परिणाम - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स शेअर देऊ शकतो 23 टक्केपर्यंत परतावा, महत्वाची अपडेट आली - NSE: RELIANCE Yes Bank Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले, येस बँक शेअर्स रॉकेट तेजीत, अपडेट नोट घ्या - NSE: YESBANK Tata Motors Share Price | पडझडीतही गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग - NSE: HAL IRFC Share Price | हा मल्टिबॅगर शेअर ठरू शकतो फायद्याचा, पुढे टार्गेट प्राईस अपेक्षित जाणून घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | मंदीत संधी, स्वस्तात मिळतोय या कंपनीचा शेअर, संयम ठेवल्यास मोठा परतावा मिळेल - NSE: SUZLON
x

Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती

Insurance Tips

Insurance Tips | प्रत्येक व्यक्तीला नवीन कार खरेदी करायला आवडते. आपल्याजवळ देखील एक मोठी फोर व्हीलर गाडी असावी असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. मोठ्या हौसेने लोक नवनवीन गाड्या खरेदी करतात परंतु गाडीबरोबर एक महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे कार इन्शुरन्स. कार इन्शुरन्स हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच व्यक्ती कार इन्शुरन्सदरम्यान काही मोठ्या चुका करून ठेवतात आणि या कारणामुळे त्यांचे इन्शुरन्स क्लेम कंपनी सर्रासपणे रिजेक्ट करते.

या धकाधकीच्या जीवनात ‘नजर हटी गुजर घटना घटी’. असं झालं म्हणजेच तुमच्या कारचा अचानक अपघात होऊन तुमच्या कारचे भले मोठे नुकसान झाले तर जो काही खर्च होईल तो कंपनी करत असते. समजा कार मालकाने इन्शुरन्स दरम्यान काही गोष्टींची व्यवस्थित सेटलमेंट केली नाही तर, त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. आज आपण या बातमीपत्रातून कार इन्शुरन्स सेटलमेंटच्या संपूर्ण गोष्टींची माहिती घेणार आहोत.

लायसन्स नाही तरीसुद्धा ड्रायव्हिंग करणे धोक्याचे :

तुम्ही स्वतःची गाडी रस्त्यावर चालवत असाल तर, तुमच्याजवळ कारचे लायसन्स असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारचे लायसन्स हे एक अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे जे तुमच्या कारची शाश्वतीत देते. समजा तुमच्याजवळ कार लायसन्स नसेल आणि तरीसुद्धा तुम्ही गाडी चालवत असाल त्याचबरोबर तुमच्या लायसन्स नसलेल्या गाडीचा एक्सीडेंट झाला तर, कंपनी तुम्हाला एक रुपया देखील देत नाही.

इन्शुरन्स प्रीमियम भरण्यास उशीर करणे :

बऱ्याच व्यक्ती आरती अडचणींमुळे कारचा इन्शुरन्स प्रीमियम भरण्याकडे दुर्लक्ष करतात आणि तिथेच फसतात. तुम्ही कारचे इन्शुरन्स भरण्यास उशीर करत असाल तर आत्ताच सावध व्हा. नाहीतर तुम्हाला कार इन्शुरन्स क्लेम करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. त्याचबरोबर तुम्ही नशेमध्ये गाडी चालवत असाल तरीसुद्धा इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी थोडाफार प्रमाणात अडचणी समोर येतील.

इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी उशीर केला तर :

समजा तुमच्या कारचा ड्रायव्हिंगमध्ये एक्सीडेंट झाला आणि तुमच्या गावचे जास्त प्रमाणात नुकसान झाले तर, तुम्हाला लगेचच कार इन्शुरन्स कंपनीकडे क्लेमसाठी मागणी करावी लागेल. समजा कारचा एक्सीडेंट होऊन बरेच दिवस उलटून गेले असतील आणि तुम्ही इन्शुरन्स क्लेमसाठी कंपनीकडे मागणी करत असाल तर, तुमचा क्लेम अर्ज सर्रासपणे फेटाळला जाऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Insurance Tips Monday 16 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Insurance Tips(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या