 
						LIC Aadhaar Shila Policy |आज महिला प्रत्येक क्षेत्रात यशस्वीरित्या नाव कमवत आहे. आपल्या पायावर उभी राहून पैसे देखील कमवत आहे. प्रत्येक काम करणा-या महिलेला देखील वेगवेगळी स्वप्ने पूर्ण करण्यास गुंतवणूकीची गरज असते. अशात ज्या महिला गृहिणी आहेत त्या देखील आपल्या महिन्याच्या घर खर्चातून ठरावीक रकमेची बचत करत असतात. महिलांची बचत अधिक चांगली व्हावी तसेच त्यांना याचा नफा मिळावा यासाठी LIC ने एक नविन योजना आणली आहे. या योजनेचा महिलांना जास्तीत जास्त फायदा होईल.
या योजनेचे नाव आधारशिला योजना असे आहे. यामध्ये १८ ते ५५ वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात. यासाठी त्यांना दररोज फक्त २९ रुपये भरावे लागणार आहेत. ३० रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून महिला मॅच्युरिटीवर ४ लाख रुपये मिळवू शकतात.
भरगोस कॅश बॅक
महिलांच भविष्य सुरक्षीत व्हाव यासाठी ही योजना काम करत आहे. यात २० वर्षांच्या कालावधीसाठी दिवसाला २९ रुपये म्हणजे महिना ८९९ रुपये जमा केल्यास एका वर्षात १०,९५९ रुपये जमा होतात. तर २० वर्षांत ही रक्कम २ लाख १४ हजार होते. संपूर्ण कालावधी पूर्ण झाल्यावर मॅच्युरिटीवर ३,९७,००० रुपये मिळतात.
या अटी पाळणे अनिवार्य
आधारशिला योजना ही फक्त महिलांसाठीच आहे. मात्र यात सर्वच महिला लाभ घेऊ शकत नाहीत. ज्या महिलांचे आधार कार्ड आहे त्याच महिला या योजनेच्या लाभार्ती होऊ शकतात. योजनेत कमाल २० आणि किमान १० वर्षांची गुंतवणूक केल्यावरच जास्त लाभ घेता येतो. जास्तीत जास्त ३ लाख रुपयांपर्यंत तुम्ही पैसे गुंतवू शकता. तर ७० वर्षांपर्यंत तुम्ही ही योजना एक्स्टेंड करू शकता. यावर रिटर्नमध्ये व्याजाचे पैसे १, ३, ६ अशा महिन्यांत मिळतात. मॅच्युरिटीवर महिलांना यात मोठा नफा मिळतो. तसेच या योजनेत सदर महिला तसेच जर तिचा मृत्यू झाला असेल तेव्हा महिलेच्या कुटूंबीयांना देखील मदत केली जाते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		