1 May 2024 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Birlasoft Share Price | मालामाल होण्याची संधी! 633% परतावा देणारा शेअर चर्चेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा अपडेट, स्टॉक Hold करावा की Sell करावा? RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर? Tata Motors Share Price | 1 वर्षात पैसे दुप्पट झाले, आता टाटा मोटर्स कंपनीबाबत अपडेट आली, शेअरला किती फायदा? Nippon India Mutual Fund | महिना SIP बचतीतून करोडमध्ये परतावा देत आहेत 'या' 8 योजना, पैशाने पैसा वाढवा Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतील हे 2 रुपये ते 9 रुपये किमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! जयप्रकाश पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी
x

राज्यात निवडणूक संपताच भाजप-सेना सरकारकडून घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ

BJP, Shivsena, Udhav Thackeray, Narendra Modi, Loksabha Election 2019

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीदरम्यान सामान्य व्यक्तीला सरकारनं जोराचा धक्का दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. घरगुती एलपीजी सबसिडी असलेल्या सिलिंडर गॅसची किंमत ६ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरच्या किमतीत २२.५ रुपयांची वाढ झाली आहे, असं वृत्त द हिंदू बिझनेस लाइननं प्रसिद्ध केलं आहे.

या किमती १ मेपासून म्हणजे आजपासून लागू होणार आहेत. घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमतीनंतर दिल्लीतल्या रहिवाशांना सबसिडीच्या सिलिंडरसाठी ५०२ रुपये मोजावे लागणार आहेत. तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरसाठी ७३० पेक्षा अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. १ एप्रिललाही सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या.

तेल कंपन्यांनी सबसिडी नसलेल्या गॅस सिलिंडरच्या किमतीत 5 रुपयांची वाढ केली होती. तर सबसिडीवाल्या सिलिंडरच्या किमतीत २५ पैशांची वाढ नोंदवण्यात आली होती. वर्षाला १४.२ किलोचे १२ सिलिंडर ग्राहकाला उपलब्ध करून दिले जातात. त्यातच सबसिडीचे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x