
Money Making Scheme | आपल्या पैशांच्या सुरक्षिततेसाठी अनेक जण पोस्टच्या विविध योजनेवर विश्वास ठेवतात. पोस्टा प्रमाणेच एलआयसी देखील तुमचा विश्वास आजवर जपत आलेली आहे. सध्याच्या ट्रेंन्डमध्ये अनेकांचा कल झटपट नफा मिळवण्याकडे आहे. यात मोठी रिस्क देखील आहे. त्यामुळे सुरक्षेची खात्री देत एलआयसीने आणखीन एक नविन पॉलिसी खास तुमच्यासाठी आणली आहे.
एलआयसीची जीवन प्राधिकरण पॉलीसी तुम्हाला फक्त नफा नाही तर लखपती बनवू शकते. तसेच यात तुम्हाला जीवन कवचही दिले जाते. भारतीय आयुर्विमा महामंडळ कायमच संरक्षणाची हमी देत आणि बजावत आले आहे. एलआयसी आणि आयआरडीएच्या नियमांचे पालन करत ही नविन पॉलीसी काढण्यात आली आहे. तसेच ही काही नविन पॉलीसी नाही. गेली ५ वर्षे नागरिय या योजनेचा लाभ घेत आहेत. ही योजना ३ फेब्रुवारी २०१६ रोजी सुरू करण्यात आली.
जीवन प्राधिकरणमध्ये तुम्हाला न चुकता प्रमियम भरणे आवश्यक आहे. तरच या योजनेचा फायदा होईल. यात दर पाच वर्षांनी तुमचे लाईफ कवर वाढवण्यात आले आहे. ही वाढीव रक्कम तुमच्या पॉलीसीच्या सक्रिय कालावधीवर अवलंबून आहे.
ज्या तारखेला तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तेव्हा पासून मृत्यू पर्यंत ही पॉलीसी तुम्हाला सुरक्षीत कवच देते. तसेच जर पॉलीसी घेतल्यावर ६ ते १० वर्षामत मृत्यू झाल्यास १२५ टक्के रक्कम मिळते. ११ ते १५ मध्ये १५० टक्के आणि १६ ते २० मध्ये २०० टक्के रक्कम देण्याची हमी आहे. तसेच अपंग लाभ देखील मिळतो. यासाठी जास्तीची रक्कम भरण्याची आवश्यकता नसते. तुमची मॅच्युरीटी पुर्ण झाल्यास यात २८ लाख रुपये परत दिले जातात.
२० वर्षांची गुंतवणूक असेल तर दर महा ६ हजारांचा हप्ता भरावा लागतो. म्हणजे रोजचे २०० रुपये. वयाच्या १२ व्या वर्षी सुध्दा यात भाग घेता येईल. योजनेत गुंतवणूक करण्याचे कमाल वय ४५ वर्षे आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.