Vehicle Insurance | पावसाळा सुरू झाला आहे, तुमच्या वाहनाचे इन्शुरन्स कव्हर आहे का?, त्यासाठी हे लक्षात ठेवा

Vehicle Insurance | पावसाळा सुरू झाला की रस्त्यांवर खड्डे पडणे आणि गाड्यांची वाट लागणे हे निश्चित आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहन मालकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. मुसळधार पाऊस पडला की त्यामुळे सगळीकडे पाणी तुंबते आणि पुर परिस्तिथी निर्माण होते त्या पुराच्या पाण्यात अडकल्याने वाहनांचे इंजिन जाम होते किंवा झाडे कोसळण्याच्या बातम्या येतात आणि झाड कोसळल्याने वाहनांचे नुकसान होते. तुमची गाडी रस्त्यात अडकू शकते किंवा अनेक प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनेकांना इन्शुरन्स घेताना माहीतच नसते :
अनेकांना इन्शुरन्स घेताना माहीतच नसते की, स्टँडर्ड इन्शुरन्स पॉलिसीत इंजिनची सुरक्षा, टायरचे स्टँड अलोन डॅमेज, एनसीबी प्रोटेक्शनसारखे अनेक नुकसान कव्हर होत नाही. तर ह्यावर उपाय म्हणून कॉम्प्रेहेन्सिव्ह पॉलिसी आणि अॅड ऑन घेऊन तुम्ही मोठे नुकसान टाळू शकता. पावसाळ्यात होणाऱ्या अतिरिक्त खर्चापासून वाचण्यासाठी मोटार कॉम्प्रेहेन्सिव्ह पॉलिसी योग्य आहे. यात झीरो डेप्रिसिएशन, इंजिन प्रोटेक्शन, कंझ्युमेबल कव्हर आणि हायड्रोस्टॅटिक लॉक कव्हर (पुराची शक्यता असलेल्या भागात जेथे वाहन पुराच्या पाण्यात अडकण्याची भीती आहे त्यासाठी बेस्ट आहे) आणि आपण त्यात पर्सनल अॅक्सिडेंट पॉलिसीसारखे अॅड–ऑन घेऊ शकता आणि जास्तीत जास्त नुकसान टाळू शकता. रायडर्सचा खर्च हे वाहनाचे घोषित विमा मूल्याच्या (आयडीव्ही) ०.१–२% प्रमाणात असू शकतो.
नैसर्गिक आपत्तीने होणारे नुकसान :
गाडीवर वीज पडणे, झाड कोसळणे, भिंत पडणे, भूस्खलनसारखे अॅक्ट ऑफ गॉड (नैसर्गिक आपत्ती)/ नैसर्गिक संकटाची जोखीम आणि मालक किंवा चालकाचे पर्सनल अॅक्सिडेंट मोटार कॉम्प्रेहेन्सिव्ह पॉलिसीत बाय डिफॉल्ट कव्हर होत असते. मात्र, लक्षात ठेवा की, अपघाती नुकसान किंवा मानवी चुकीमुळे होणारे नुकसान (चालकाच्या चुकीमुळे होणारे नुकसान) मोटार कॉम्प्रेहेन्सिव्ह पॉलिसीत कव्हर होत नाही. उंदीर, किड्यांमुळे झालेले नुकसान, टायर पंक्चर होणे, फाटणे, तोडफोडसारख्या गोष्टीही बाय डिफॉल्ट कव्हर होत नाहीत.त्याचा नुकसान तुम्हाला सहन करावा लागेल.
मार्केट मध्ये अनेक कार कंपन्या :
आजकाल मार्केट मध्ये अनेक कार कंपन्या आहेत जे त्यांच्या ग्राहकांना सध्या रोड साइड असिस्टंन्स, पुराचे पाणी इंजिनमध्ये घुसण्यासारख्या नुकसानीवर इन्शुरन्स कव्हर पुरवतात. तुम्हाला ह्या गोष्टीची माहिती करून घ्यावी लागेल आणि खात्री करून तपासावी लागेल की, तुमच्या कार कंपनीने तुम्हाला असे इन्शुरन्स कव्हर दिले आहे की नाही.
तुम्ही तुमच्या वाहन इन्शुरन्सविमा कव्हरेजमध्ये नव्याने काही गोष्टी जोडू शकता जसे :
* प्रवाशाचे पर्सनल अॅक्सिडेंट कव्हरेज
* थर्ड पार्टी प्रॉपर्टी डॅमेज कव्हर
* पर्सनल अॅक्सिडेंट कव्हरचे सम अॅश्योर्ड वाढवणे
* इंजिन सुरक्षा, टायर कव्हर
* चावी हरवणे वा नुकसान होणे
* नो क्लेम बोनस प्रोटेक्टर
* रिटर्न टू इनव्हॉइस कव्हर
* हायड्रोस्टॅटिक लॉक कव्हर
* रोडेंट बाइट (कुरतडणे) पासून बचाव
* वाहनाचे रोडसाइड असिस्टन्स
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Vehicle Insurance policy as on 19 July 2022
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER