18 January 2025 11:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

हमास आणि इस्रायल युद्धात, इस्रायलचा अतिरेक पाहून अमेरिकेची पलटी! जगभर इस्रायल विरोधात लोकं रस्त्यावर, बायडन यांचा इस्रायलला इशारा

Israel Hamas war

Israel Hamas War | मध्यपूर्वेतील रक्तरंजित युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे सैनिक गाझा पट्टी ताब्यात घेण्यासाठी सातत्याने हालचाली करत आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात अनेक चिमुकल्यांचा देखील मृत्यू झाला आहे. आता जगभर सामान्य लोकं रस्त्यावर उतरून इस्रायलला आवरा असा दबाव त्या-त्या देशातील सरकारला करत आहेत.

आतापर्यंत युद्धात इस्रायलसोबत दिसणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नेतन्याहू यांना इशारा दिला आहे की, इस्रायलने गाझावर कब्जा करणे ही मोठी चूक ठरेल. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रविवारी प्रसारित केलेल्या एका मुलाखतीत इस्रायलला गाझा पुन्हा ताब्यात न घेण्याचा इशारा दिला होता.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात किमान चार हजार लोकांचा मृत्यू झाला असून त्यात मोठ्या संख्येने नागरिकांचा समावेश आहे. मृतांमध्ये 29 अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे.

हमासविरुद्ध च्या सीमेपलीकडील युद्धात गाझा पट्टीवर पूर्ण ताबा मिळवण्याच्या उद्देशाने इस्रायली लष्कर पुढे सरसावले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हे वक्तव्य केले आहे. इस्रायलच्या लष्कराने रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जमीन, हवाई आणि नौदलाने गाझाला तिन्ही बाजूंनी वेढा घातला आहे. आम्ही ग्रीन सिग्नलची वाट पाहत आहोत. त्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवरील हवाई हल्ले थांबवले आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी तीन तासांचा अल्टिमेटम दिला.

गाझावर पूर्ण पणे कब्जा न करण्याचा इशारा
जो बायडेन यांनी ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायलला जोरदार पाठिंबा दिला आहे. हमासविरुद्धच्या युद्धात अमेरिकेने इस्रायलला शस्त्रास्त्रांची मदतही केली आहे. हमासच्या नियंत्रणाखाली लपलेल्या गाझा या किनारपट्टीच्या प्रदेशाला इस्रायलने प्रत्युत्तरादाखल वेढा घातल्याबद्दल इस्रायलवर टीका करण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी गाझामध्ये मानवतावादी संकटाचा इशारा दिला आहे. पण नव्या मुलाखतीत बायडन यांनी इस्रायलला गाझावर पूर्ण पणे कब्जा न करण्याचा इशारा दिला.

काय म्हणाले बायडन
ही मोठी चूक ठरेल, असे बायडन यांनी म्हटले आहे. बघा, माझ्या मते गाझामध्ये जे घडले ते हमास आहे आणि हमासचे अतिरेकी घटक सर्व पॅलेस्टिनी लोकांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. इस्रायलने गाझावर पुन्हा ताबा मिळवणे चूक ठरेल, असे मला वाटते. पण अतिरेक्यांना तिथून बाहेर काढणे ही अत्यावश्यक गरज आहे, असेही ते म्हणाले.

बायडन इस्रायलला भेट देणार का?
हमासच्या हल्ल्याने होरपळत असलेल्या इस्रायली नागरिकांसोबत एकजूट दाखवण्यासाठी येत्या काळात इस्रायलला भेट द्यायची की नाही, यावर विचार सुरू असतानाच राष्ट्राध्यक्षांनी हे वक्तव्य केले आहे. इस्रायलच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना इस्रायलच्या दौऱ्याचे निमंत्रण दिले आहे. मात्र, बायडेन यांनी अद्याप कार्यक्रम निश्चित केलेला नाही.

News Title : Israel Hamas war US President Joe Biden warns Israel over occupy to Gaza 16 October 2023.

हॅशटॅग्स

#Israel Hamas war(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x