30 April 2025 9:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

खतरो के खिलाडी । अमेरिकन विमानातून अफगाणी नागरिकांचा मुंबई लोकल ट्रेन प्रमाणे प्रवास - पहा फोटो

Taliban in Afghanistan

काबुल, १७ ऑगस्ट | तालिबान्यांनी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. यामुळे हजारो लोक देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांनी लोखंडी कुंपण आणि मोठ्या भिंतींवरुन उड्या मारल्या आणि काबूल विमानतळावर शिरकाव केला. लोकांनी भीतीपोटी तेथे दिसणाऱ्या कोणत्याही विमानात चढण्याचा प्रयत्न केला. विमानतळावरील अशी अनेक दृष्ये तेथी उद्भवलेल्या परिस्थीतीचे भयावह दर्शन घडवत आहेत.

सदर फोटो मध्ये जे लोक दिसत आहे ते पॅसेंजर ट्रेन मधील जनरल बोगीत बसलेले नाहीत तर हे आहे आहे अफगाण नागरिकांनी भरलेले अमेरिकन विमान ..! तेथील लोक तालिबानच्या आगमनाने भयभीत झाले आहेत आणि देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी प्राणांची आहुती द्यावी लागली तरही ते माघार घेताना दिसत नाहीत. काबूल विमानतळावरून उड्डण करण्यासाठी सज्ज असलेले हे अमेरिकन विमानात दिसणारे हे दृश्य, अफगाण नागरिकांची दुर्दशा दर्शवते. विमानात एकूण 640 लोक बसले होते.

तालिबानच्या अराजक राजवटीने काळे दिवस पुन्हा येण्याची भीती बाळगून देश सोडून जाण्यासाठी हजारो अफगाणांनी सोमवारी काबूल विमानतळावर गर्दी केली. रहदारी वाढल्यामुळे विमानतळाचे दरवाजे बंद झाले, तेव्हा भयभीत नागरिकांनी भितीवरून उड्या मारल्या, लोखंडी कुंपणे ओलांडली आणि आत शिरले. विमानाच्या धावपट्टीवरही लोकांनी तोबा गर्दी केली होती.

अमेरिकन विमान दिसताच लोकांनी आत शिरण्यास सुरुवात केली. एकमेकांना अक्षरशः लटकत ते विमानात घुसले. सुमारे 640 अफगाण अमेरिकन विमानात चढले आणि खाली बसले. सोबत कोणतेही सामान न घेताच हे नागरिक मरणाच्या भीतीने हे सहन करीत होते. तालिबानपासून बचाव करण्यासाठी, देश सोडून जाण्याशिवाय दुसरा मार्ग त्यांना दिसत नव्हता.लोक विमानात गेल्यानंतरचे चित्र एखाद्या रेल्वेच्या जनरल बोगीपेक्षाही भीषण होते. या विमानाचे फोटो अधिकृत अमेरिकन मीडिया कंपनी डिफेन्स वनने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. इतर अमेरिकन विमानांमध्येही अशीच परिस्थिती दिसून आली.

विमान धावपट्टीवरुन धावत असताना चालत्या विमानाला काहीजण लटकल्याचे दृष्ये काल पाहायला मिळाले होते. विमानाचे पंख आणि टायरवर लोक बसल्याचेही चित्र होते. वर उडालेल्या विमातून तिघे जण हवेतून भिरकवल्याचे व जमिनीवर पडल्याचेही भयावर दृष्य काल सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Afghani citizens travel from Air Plane after Taliban ruling started in Afghanistan news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Taliban(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या