6 May 2025 3:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

भारतातील कोरोनाचं वाढतं प्रमाण; WHO'चा भारताला लॉकडाऊनबाबत सल्ला

WHO, World Health Organization, India, Lockdown

नवी दिल्ली, २३ मे – मागील काही दिवासांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येने शुक्रवादी नवा उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी एकाच दिवसांत कोरोनाचे सहा हजार ६५४ नवे रुग्ण सापडल्याने देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख २५ हजार १०१ झाली आहे. दरम्यान, देशात कोरोनामुळे मृत्य झालेल्यांची संख्या ३ हजार ७२० पर्यंत पोहोचली आहे.

मात्र दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत ५१ हजार ७८४ कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर सध्या देशात कोरोनाचे ६९ हजार ५९७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात १३७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची संख्या ३ हजार ७२० पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्याचे आव्हान अधिकाधिक खडतर होत चालले आहे. भारतातील कोरोना विषाणूचं वाढतं प्रमाण लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेनं भारताच्या सात राज्यांत लॉकडाऊनला सूट न देण्याचा सल्ला दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तेलंगणा, चंदीगड, तामिळनाडू आणि बिहार इथे बंदी कायम ठेवण्याची गरज आहे. कारण गेल्या दोन आठवड्यांत कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. ज्या राज्यात कोरोना संक्रमित ५ टक्क्यांहून अधिक रुग्ण आहेत, तेथे लॉकडाउन काटेकोरपणे सुरू ठेवावं, असा सल्ला WHOकडून देण्यात आला आहे.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठानं केलेल्या अभ्यासात असं आढळलं आहे की, अमेरिकेतील ५० टक्के राज्यांमध्ये लॉकडाऊनच काढलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे भारतातील ३४ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश २१ टक्के या वर्गवारीत येतात. गेल्या ७ मे च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात १८%, गुजरातमध्ये ९%, दिल्लीत ७%, तेलंगणामध्ये ७%, चंडीगडमध्ये ६%, तामिळनाडूमध्ये ५% आणि बिहारमध्ये ५% कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही सर्व राज्ये डब्ल्यूएचओ अंदाजापेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहेत.

 

News English Summary: The corona virus has killed 3,720 people in the country so far. In view of the rising incidence of corona virus in India, the World Health Organization (WHO) has advised seven states in India not to grant lockdown exemptions.

News English Title: corona virus increasing number of Covid 19- world Health organization advises 7 states to continue lockdown News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या