1 May 2025 5:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT
x

भारताने चाचण्यांची संख्या वाढवल्यास तिथे अमेरिकेपेक्षा जास्त रुग्ण आढळतील - ट्रम्प

Corona Virus, Covid 19

वॉशिंग्टन, ६ जून: मागील २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ९,८८७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २,३६,६५७ इतका झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी कोरोनाचे जवळपास १० हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे इटलीला मागे टाकत सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आला आहे.

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ११५९४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ११४०७३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची सध्या बिकट अवस्था झाली आहे. सुमारे सव्वा दोन महिने चाललेल्या लॉकडाऊननंतरही मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या घटलेली नाही. मात्र आता देशाच्या आर्थिक राजधानीपेक्षा राजकीय राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढू लागला आहे.

दरम्यान, अमेरिकेतल्या जॉन्स हॉपकिन्स कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटरनं दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णांची संख्या १९ लाखांपेक्षा जास्त आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत २ लाख ३६ हजार १८४ जणांना, तर चीनमध्ये ८४ हजार १७७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतानं आतापर्यंत ४० लाख जणांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबद्दलची माहिती दिली आहे.

अमेरिकेनं आतापर्यंत २ कोटींहून जास्त कोरोना चाचण्या घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. तुम्ही जितक्या जास्त चाचण्या घेता, तितके जास्त रुग्ण आढळून येतात, असं ट्रम्प यांनी म्हटलं. ‘जितक्या जास्त चाचणी होतील, तितके जास्त रुग्ण सापडतील. आपण जास्त चाचण्या घेत असल्यानं रुग्णांची संख्यादेखील जास्त आहे,’ असं म्हणत असताना ट्रम्प यांनी भारत आणि चीनचा संदर्भ दिला. ‘चीन आणि भारतानंदेखील चाचण्यांची संख्या वाढवल्यास तिथे अमेरिकेपेक्षा जास्त रुग्ण आढळून येतील,’ असं ट्रम्प म्हणाले.

जगातील कोरोना बाधितांची संख्या ६८ लाखांहून जास्त आहे. यात अमेरिकेचे सर्वाधिक रुग्ण आहेत. अमेरिकेतील १९ लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही अमेरिकेत लक्षणीय आहे. जगभरात आतापर्यंत कोरोनामुळे जवळपास ४ लाख जणांचा मृत्यू झाला आहे. यातले १ लाखांहून अधिक जण एकट्या अमेरिकेतले आहेत.

 

News English Summary: The number of patients is also higher because we are taking more tests, ‘Trump said, referring to India and China. “If China and India also increase the number of tests, there will be more patients there than in the United States,” Donald Trump said.

News English Title: Corona Virus then India will have more patients than america Trump Invites Comparison News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या