13 August 2020 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
x

इथियोपियाच्या पंतप्रधानांना शांततेचा नोबेल जाहीर

Nobel Peace Prize, ethiopia Prime Minister abiy ahmed, Nobel Award 2019

स्टॉकहोमः इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना २०१९ च्या शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. शत्रू देश असलेल्या इरिट्रिया यांच्यासोबत शांतता प्रस्तापित केल्याने अबी अहमद यांना शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आल्याची माहिती पारितोषिक निवड समितीने दिली आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

२०१९चा शांततेचा नोबेल जाहीर करताना नोबेल समितीने म्हटले की, “शांतता प्रस्थापित केल्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी तसेच शेजारील देश इरिट्रियासोबत असलेला सीमावाद सोडवण्यासाठी घेतलेल्या निर्णायक पुढाकारासाठी अबिय यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.”

“२०१९ चा नोबेल शांती पुरस्कार हा इथियोपियासह पूर्व आणि ईशान्य आफ्रिकी प्रदेशात शांतता आणि सलोखासाठी काम करणार्‍या सर्व व्यक्तींची ओळख बनला आहे. इरिट्रियाचे राष्ट्राध्यक्ष इसाईअस अफवेरकी यांनी यासाठी दिलेल्या बहुमुल्य सहकार्यामुळे अबिय अहमद यांना कमी वेळेत शांतता करारावर काम करता आले,” असेही नोबेल समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

तो वाद सोडवण्यासाठी अहमद अली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यासाठीच त्यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. इथियोपियाकडून पूर्व आणि उत्तर पूर्व आफ्रिकी क्षेत्रात शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. अहमद अलींनी देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि राजकीय सुधारणा केल्या आहेत. एरिट्रियाचे राष्ट्रपती इसाइआस अफवेरकीबरोबर अहमद अली यांनी शांती करारासाठी वेगानं काम केलं, त्यामुळेच दोन्ही देशांतला हा वाद संपुष्टात आला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x