लशीच्या कच्च्या मालावर अमेरिकेकडून निर्यात बंदी | प्रथम अमेरिकेन लोकं | भारताच्या लस मोहिमेची कोंडी

नवी दिल्ली, २४ एप्रिल: कोरोना साथ सुरू झाल्यापासून विविध देशांना लस निर्यात करणारा भारत आता कोविड १९ प्रतिबंधक लस आयात करणारा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा मोठा देश ठरला आहे. आतापर्यंत या महिन्यात भारताने १.२ दशलक्ष लस मात्रा निर्यात केल्या आहेत. जानेवारी ते मार्च दरम्यान भारताने ६४ दशलक्ष मात्रा परदेशात पाठवल्या होत्या.
या महिन्यात भारताने सुमारे १० लाख २० हजार लसींची निर्यात केली आहे. या अगोदर जानेवारी व मार्च दरम्यान भारताने ६ कोटी ४० लाख लसींची निर्यात केली होती, अशी आकडेवारी परराष्ट्र खात्याने दिली आहे. बाहेरच्या देशांना कोविड-१९ लसींची निर्यात केल्याने व काहींना भेट म्हणून दिल्याने भारताला एकाएकी मोठ्या प्रमाणात लसींचा तुटवडा भासू लागला आहे. आता काही दिवसांपूर्वी सरकारने रशियाच्या स्फुटनिक लसीच्या आयातीला परवानगी दिली. ही लस मे पासून उपलब्ध होईल. रशिया भारताला ८५ कोटी लसींचा खुराक देणार आहे.
भारतीय सोडून प्रथम जगाला लस वाटपात प्राधान्य देणाऱ्या मोदी सरकारला आता जगाचा आणि विशेषकरून अमेरिकेचा स्वार्थी चेहरा समोर आला आहे आणि याच विषयाला अनुसरून अमेरिकन सरकारने आता अमेरिकन फस्ट म्हटल्याचे दिसतंय.
कोरोना लशीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे भारताची लसीकरण मोहिमेची गती मंदावण्याची भीती व्यक्त होत असतानाच, या निर्बंधांचे अमेरिकेने समर्थन केले आहे. अमेरिकी लोकांच्या गरजांची काळजी घेणे हे बायडेन प्रशासनाचे प्रथम कर्तव्य असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. लशीच्या कच्च्या मालावरील बंदी उठवण्याबाबत भारताच्या विनंतीवर बायडेन प्रशासन केव्हा निर्णय घेईल असा प्रश्न अमेरिकी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांना विचारण्यात आला होता.
अमेरिका सध्या देशातील लोकांचे लसीकरण करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नात गुंतले असून आतापर्यंत तो यशस्वी ठरला आहे. ही मोहीम सुरू असून आम्ही हे दोन कारणांसाठी करत आहोत. एक म्हणजे अमेरिकी लोकांबाबत आमची विशेष जबाबदारी आहेत. दुसरे कारण म्हणजे, जगातील कुठल्याही देशापेक्षा अमेरिकेला करोनाचा जास्त फटका बसला आहे. आमच्या एकाच देशात साडेपाच लाखांहून अधिक मृत्यू झाले असून, लाखो लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे अमेरिकी लोकांचे लसीकरण होणे केवळ अमेरिकेच्याच नव्हे तर उर्वरित जगाच्याही हिताचे आहे’, असे प्राइस यांनी सांगितले.
News English Summary: India has exported about 1 million 20 thousand vaccines this month. Earlier, India had exported 64 million vaccines between January and March, according to the External Affairs Ministry. Exporting Covid-19 vaccines to foreign countries and giving them as gifts to some has led to a sudden shortage of vaccines in India.
News English Title: Exporting Covid 19 vaccines to foreign countries and giving them as gifts to some has led to a sudden shortage of vaccines in India news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN