7 December 2021 5:18 AM
अँप डाउनलोड

विजय मल्ल्या; प्रत्यार्पणाबाबत आज लंडन कोर्टात अखेरची सुनावणी

नवी दिल्ली : भारतीय बँकांना तब्बल ९ हजार कोटींचा चुना लावून देशाबाहेर पलायन करणारा आणि सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या उद्योजक विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज लंडन कोर्टात अखेरची सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भारताकडून सुद्धा विशेष काळजी घेण्यात येत असून सीबीआय व इडीचे पथक लंडनला रवाना करण्यात आलं आहे.

विजय मल्ल्याने दोन वर्षांपूर्वी भारतातील अनेक बँकांना तब्बल ९ हजार कोटींचा चुना लावला होता आणि देशाबाहेर पलायन करून थेट लंडनला वास्तव्य करत होता. इतका मोठा घोटाळा करून सुद्धा तो देशाबाहेर इतक्या सहज कसा काय पळून जाऊ शकला अशा अनेक प्रकारच्या टीका मोदी सरकारवर विरोधकांकडून आणि जनतेकडून करण्यात आली होती.

सरकारवरील टाकेनंतर हालचालींना वेग आला आणि भारताकडून सुद्धा मल्ल्याच्या प्रत्यर्पणासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी विजय माल्याच्या वकिलाने भारत सुरक्षित नसल्याचे लंडन कोर्टात म्हटलं होत. त्यानंतर ही प्रत्यर्पणासाठी सुरु होती. अखेर विजय माल्याच्या प्रत्यर्पणासाठी लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टात आज अखेरची सुनावणी होणार आहे.

हॅशटॅग्स

#Vijay mallya(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x