लाहोर: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या खटल्यात विशेष कोर्टाने आज मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. मुशर्रफ सध्या पाकिस्तानात नाहीत. त्यांच्यावर दुबईत उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच मुशर्रफ यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आरोग्याबाबत माहिती दिली होती. मी कोणत्या परिस्थितीत आहे हे चौकशी आयोगानं येऊन पाहावं, असं ते म्हणाले होते.

देशात आणीबाणी पुकारणे हा देशद्रोह असून त्याच आरोपाखाली मुशर्रफ यांच्यावर खटला चालविला जावा, अशी मागणी करणारी याचिका येथील त्रिसदस्यीय विशेष कोर्टात २०१३ साली दाखल करण्यात आली होती. ही याचिका कोर्टाने ग्राह्य धरत खटला दाखल करुन घेतला होता. मागील सहा वर्षांपासून या प्रकरणामध्ये सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणी आज कोर्टाने आपला निर्णय सुनावला असून मुशर्रफ यांनामृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

२००७ मध्ये परवेझ मुशर्रफ यांनी राष्ट्रपती असताना आणीबाणी लागू केली होती. यावरून त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटला सुरू होता. एखाद्या सेवेतील अथवा निवृत्त लष्करप्रमुखावर देशद्रोहाचा खटला चालविण्याची ही पहिलीच वेळ आहे. देशात आणीबाणी लादणे, सत्ता उलथविणे, संविधान नष्ट करणे, सर्वोच न्यायालयाच्या न्यायमूर्तींना अटक करणे आदी आरोप परवेझ मुशर्रफ यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. परवेझ मुशर्रफ यांनी २००७ ला शंभरहून अधिक न्‍यायाधीशांना पदावरून हटवले होते.

 

Web Title:  Former President of Pakistan Pervez Musharraf Handed Death Penalty by Peshawar High Court.

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष व लष्करप्रमुख मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा