नवी दिल्ली : उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन सध्या शहाणा झाल्याचं चित्र आहे. उत्तर कोरिया यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही असं त्याने जाहीर केलं आहे.

वारंवार अण्वस्त्र चाचण्या करून अमेरिकेला युद्धाची चेतावणी देण्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अमेरिका आणि उत्तर कोरिया मधील परिस्थिती खूप विकोपाला गेल्याचे चित्र जगभरात होते. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला थेट युद्धाचाच इशारा दिला होता.

हुकुमशहा किम जोंग उनने आता अण्वस्त्र परीक्षण करणार नाही असं जाहीर केल्याने अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही असे म्हटले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून,’हुकुमशहा किंग जोंग उन यांनी घेतलेला हा मोठा निर्णय म्हणजे जगासाठी गुड न्युज आहे’. असं म्हटलं आहे.

north korea says will stop nuclear ballistic missile tests