28 June 2022 6:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
2022 Mahindra Scorpio-N | 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ-एन लाँच | किंमत आणि काय खास आहे पहा Pre-Approved Loan | तुम्हालाही प्री-अप्रुव्हड लोनसाठी ऑफर कॉल, ई-मेल किंवा एसएमएस येतात का? | मग हे जाणून घ्या लेट करंट? | सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं त्याचा अर्थ उशिरा कळला? | शिंदे गटाचा मुक्काम 12 जुलैपर्यंत वाढला सुप्रीम कोर्टाने 11 तारखेपर्यंत स्टेटस खो दिला, निर्णय नव्हे | राज्यपालांना अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही | शिंदेंचा विजयाचा उतावळेपणा Horoscope Today | 28 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल शिंदे गट फ्लोअर टेस्टसाठी जाईल? | सभागृहाच्या प्रोसिडिंग सुरू झाल्या तर थेट आमदार बरखास्तीची कारवाई सुरू होऊ शकते Hot Stocks | आज फक्त 1 दिवसात या शेअर्सनी तब्बल 40 टक्क्यांपर्यंत परतावा दिला | स्टॉक्सची यादी पहा
x

कोरोना आपत्तीत न्यूयॉर्कच्या आरोग्य खात्याचा लोकांना सेक्स संदर्भात हा सल्ला....

Corona Crisis, Covid 19, New York

न्यूयॉर्क, ३० मार्च : कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यत २७,३७० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास ६,००,००० जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. जगातल्या बहुतांश देशांमध्ये करोना व्हायरसमुळे लॉकडाउन आहे. दरम्यान, सुट्टीचे पहिले २-३ दिवस संपल्यानंतर आता घरी बसून कंटाळा येऊ लागला आहे. लोकांना वेळेचा सदुपयोग कसा करता येईल, यासाठी टीव्हीवरुन काही कार्यक्रमही दाखवले जात आहेत.

महासत्ता म्हणून ओळख असणाऱ्या अमेरिकेचे देखील कोरोनाने कंबरडे मोडले आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या ट्रॅकरनुसार अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या १ लाखांहून अधिक झाली आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रसार किती वेगाने होत आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो, गेल्या २४ तासांत तब्बल १८ हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर, ३४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. जगाच्या आकर्षणाचं केंद्र असलेलं न्यूयॉर्क सध्या सुन्न आहे. अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरात सध्या भयाण शांतता आहे. कोरोनाने शहरात थैमान घातलं असून दर १७ व्या मिनिटाला एकाचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय.

पण तणावातील लोकांसाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क सरकारने वेगळा उपाय शोधून काढला आहे. त्यांनी नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला दिला आहे. या कठिण काळात लैंगिक आरोग्याचा अभ्यास करणाऱ्या एका स्टडीने तणाव कमी करण्यासाठी एक उपाय सुचवला आहे. “चुंबनामुळे COVID-19 चा प्रसार होऊ शकतो. दुसरं कोणी नाही, तर तुम्हीच तुमचे सुरक्षित सेक्स पार्टनर आहात. साबणाने सेक्स टॉइज आणि हात स्वच्छ धुवत असाल तर, हस्तमैथुनामुळे COVID-19 चा फैलाव होणार नाही” असे न्यूयॉर्कच्या आरोग्य खात्याने अधिकृत टि्वटर अकाउंटवर म्हटले आहे.

 

News English Summary: But the New York government in the United States has come up with a different solution for people with stress. He advised citizens to masturbate. A study that studies sexual health during these difficult times suggests a measure to reduce stress. “Kisses can transmit COVID-19. If no one else is, you are your safe sex partner. If you wash soap and sex with soap, then masturbation will not spread COVID-19, “the New York Department of Health said on an official Twitter account.

 

News English Title: Story corona virus Crisis New York government health organisation says you should masturbate for relax News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x