4 May 2025 12:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

नेपाळमध्ये अतिवृष्टीमुळे २७ जणांचा मृत्यू तर ४०० जण जखमी

Nepal, Rainstorm

काठमांडू : नेपाळला सध्या अतिवृष्टी आणि वादळाचा तडाखा बसला आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत तब्बल २७ नागरिकांचा मृत्यू झाला असून ४०० पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. हिमालयन टाइम्सच्या वृत्तानुसार नेपाळच्या दक्षिण जिल्ह्याला प्रचंड प्रमाणात वादळाचा फटका बसला आहे. परसा येथे वादळाच्या तडाख्यामध्ये अनेकांचे जीव गेले असून मृतांचा आकडा अजून वाढण्याची भिती जिल्हा पोलीस कार्यालयाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, आतापर्यंत २७ लोकांना आपला जीव गमवावा लागला असून ४०० पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. बारा आणि परसा या दोन जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे.

नेपाळी लष्कराचे प्रवक्ते याम प्रसाद ढाकल यांनी सांगितले आहे की, प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी २ एमआय १७ हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आलं आहे. शंभर पेक्षा अधिक टीम पूरग्रस्त भागात कार्यरत आहेत.. प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरुच आहे. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत तसेच मृतांच्या परिवाराबद्दल दुख: व्यक्त केलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या