IPO Investment | IPO लिस्ट होण्याआधीच शेअर ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम 220 रुपये किमतीवर पोहोचला, मजबूत नफ्याचे संकेत

IPO Investment | बाजार निरीक्षकांच्या मते, हर्षा इंजिनियर्सच्या शेअर्सचा ग्रे मार्केट प्रीमियम 220 रुपयांच्या किमतीवर जाऊन पोहोचला आहे. ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर ची किंमत 200 रुपये प्रीमियमवर ट्रेड करत होती.
गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की नवीन IPO लवकरच बाजारात एन्ट्री घेणार आहे. हा IPO आहे, हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल कंपनीचा. या कंपनीचा IPO 14 सप्टेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल आणि 17 सप्टेंबरपर्यंत आपल्यासाठी खुला राहील. हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 314 ते 330 रुपये दरम्यान राहील. या कंपनीची IPO क्षमता 755 कोटी रुपये आहे, जे कंपनी शेअर्स खुल्या बाजारात विकून जमा करणार आहे. आयपीओ खुला होण्यापूर्वीच ग्रे मार्केटमध्ये शेअर्सला जबरदस्त प्रतिसाद मिळतना दिसत आहे. IPO चा ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजेच GMP तब्बल 200 रुपयांच्या वर गेला आहे.
हर्षा इंजिनियर्सच्या आयपीओची किंमत ग्रे मार्केटमध्ये 220 रुपये प्रीमियमवर पोहोचली आहे. शेअर बाजार तज्ञांच्यामते, हर्षा इंजिनियर्सच्या शेअर्सची किंमत ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त वाढली आहे. ही किंमत 220 रुपये प्रीमियमपर्यंत वाढली आहे. हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनलचे शेअर्स 26 सप्टेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध होतील. IPO मध्ये 455 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू जाहीर करण्यात आला आहे. आणि विद्यमान भागधारकांसाठी 300 कोटी रुपयांची ऑफर फॉर सेलची (OFS) घोषणा करण्यात आली आहे.
कंपनीबद्दल सविस्तर :
हर्षा इंजिनियर्स कंपनी जमा होणाऱ्या IPO फंडचा वापर कर्जाच्या पेमेंटसाठी करणार आहे. आणि सोबतच कंपनीला लागणाऱ्या खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी फंड वापरला जाईल. यंत्रसामग्रीची खरेदी, पायाभूत सुविधांची दुरुस्ती, विद्यमान उत्पादन सुविधांचे नूतनीकरण आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठीही फंड वापरला जाईल. हा IPO इश्यूमधील अर्धा भाग संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्याच वेळी, 35 टक्के इश्यू किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. आणि उर्वरित 15 टक्के भाग गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. गुंतवणूकदार किमान 45 इक्विटी शेअर्ससाठी पैसे गुंतवणूक करू शकतात. अहमदाबाद येथील ही कंपनी बेअरिंग केज आणि स्टँप तयार करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| IPO investment of Harsha Engineering international company share price in gray market on 13 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Reliance Share Price | 1600 रुपये टार्गेट प्राईस, जेफरीज ब्रोकरेज फर्म बुलिश, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: RELIANCE
-
IRFC Share Price | रेल्वे कंपनीचा मल्टिबॅगर शेअर तेजीत, किती आहे पुढची टार्गेट प्राईस? - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांसाठी फायद्याची अपडेट, मिळेल मोठा परतावा - NSE: IREDA
-
Wipro Share Price | विप्रो शेअरमध्ये 1 महिन्यात 16.43% घसरण, आता अपसाईड तेजीचे संकेत – NSE: WIPRO
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, डिव्हीडंड मिळण्याचे संकेत, टार्गेट प्राईस तपासून घ्या - NSE: IRFC
-
TATA Motors Share Price | 861 रुपये टार्गेट प्राईस, नुवामा ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग, फायदा घ्या - NSE: TATAMOTORS
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकमध्ये तेजी, ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: IDEA
-
BEL Share Price | ऑर्डरबुक मजबूत असलेल्या या कंपनीचा शेअर खरेदी करा, संयमातून मोठा परतावा मिळेल - NSE: BEL
-
Wipro Share Price | विप्रो IT शेअर्समध्ये 4.64 टक्क्यांची घसरण, पण पुढे अपसाईड तेजीचे संकेत – NSE: WIPRO
-
Jio Finance Share Price | हीच खरेदीची संधी, जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN