
ATM Cash Withdrawal | जगभरातील प्रत्येकच व्यक्ती व्यवहार करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करतो. फोन पे, गुगल पे, यासारख्या नेट बँकिंग सुविधांचा वापर करून बिल, रिचार्ज किंवा पेमेंट करत असतो. एवढेच नाही तर रोडवरच्या बऱ्याच स्टॉलवर आणि दुकानदारांकडे पेमेंटसाठी स्कॅनर पाहायला मिळते.
बाहेर गेल्यावर आपण कुठेही ऑनलाइन पेमेंट करू शकतो या विश्वासावर आपण अगदी सहजपणे फोन हातात घेऊन खरेदी करण्यासाठी बाहेर पडतो. परंतु अशी काही ठिकाण आहेत जिथे ऑनलाइन पेमेंटचे ऑप्शन्स चालत नाहीत. तुमच्यावर अशी परिस्थिती ओढवली आणि तुमच्याकडे ऐनवेळेला कॅशही उपलब्ध नसेल तर तुम्ही घाबरून न जाता आधार क्रमांकावरून अगदी सहजरीत्या पेमेंट करू शकता. ही सुविधा आधार सक्षम AePS द्वारे शक्य आहे.
AEPS म्हणजे काय जाणून घेऊ :
AEPS हे आधार क्रमांकाद्वारे ग्राहकांना अनेक बँकिंग सुविधा प्रदान करते. AEPS चा फुल फॉर्म ‘आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम’ असा आहे. यामध्ये ग्राहकांना NPCI द्वारे ‘आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम’ मधून अगदी सहजपणे पैसे काढण्याची सुविधा दिली जाते. यामधून तुम्ही बॅलन्स चेक, फंड ट्रान्सफर अगदी सहजरित्या करू शकता.
असे काढता येतील ATM शिवाय पैसे :
1) सर्वप्रथम तुम्हाला AEPS असलेल्या मायक्रो एटीएमवर जायचं आहे.
2) त्यानंतर तुम्हाला एटीएम मशीनमध्ये आधार कार्डवर असलेला 12 अंकी नंबर टाकायचा आहे.
3) बायोमॅट्रिक प्रोसेस करण्यासाठी तुमची बोटे लावा.
4) आता तुम्हाला ट्रांझेक्शन टाईप मधून कॅश विड्रॉल हा पर्याय निवडायचा आहे.
5) आता तुम्हाला किती रक्कम हवी आहे ते टाका आणि पैसे काढून झाल्यावर पावती देखील मिळवा.
पैसे काढण्याची लिमिट :
AEPS द्वारे पैसे काढण्याची लिमिट बँकांद्वारे ठरवली जाते. जी सुमारे 10 ते 50 हजार रुपये काढण्याची असते. ही सेवा ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये देखील उपलब्ध आहे.
AEPS वापरण्याचे फायदे जाणून घेऊया :
1) एटीएम कार्डशिवाय तुम्ही कुठेही आणि कधीही पैसे काढू शकता.
2) ज्या भागात मोठ्या बँका सेवा देत नाहीत तिथे हा पर्याय बेस्ट ठरू शकतो.
3) आधारकार्डद्वारे पैसे काढण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.