देशाच्या नवरत्नांपैकी एक | HAL मधील हिस्सा मोदी सरकार विकण्याच्या तयारीत
नवी दिल्ली, २७ ऑगस्ट : केंद्र सरकार हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडमधील (एचएएल) आपला हिस्सा विकणार आहे. ओएफएस म्हणजे ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून सरकार एचएएलमधील १० टक्के हिस्सा विकणार असल्याचं वृत्त सीएनबीसी आवाजनं दिलं आहे. ओएफएससाठी फ्लोअर प्राईस १००१ रुपये प्रति शेयर इतकी ठेवण्यात आली आहे. नॉन रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी ओएफएस आजपासून खुला होईल.
एचएएल कंपनी नवरत्न कंपनी आहे. जून २००७ मध्ये एचएएलला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला. उत्पादन मूल्याच्या दृष्टीनं एचएएल संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी सरकारी कंपनी आहे. एचएएल अनेक प्रकारची उत्पादनं तयार करते. याशिवाय उत्पादनाची डिझाईन्स, देखभाल, दुरुस्तीची कामंदेखील एचएएलकडून केली जातात. एचएएलनं आतापर्यंत अनेक हेलिकॉप्टर्स, विमानं आणि त्यांच्या सुट्ट्या भागांची निर्मिती केली आहे.
एचएएल संशोधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे. अनेक उत्पादनांमध्ये कंपनीनं तंत्रज्ञान हस्तांतरण केलं आहे. याशिवाय लायसन्स ऍग्रीमेंटदेखील केलं आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठी एचएएलची १३ कमर्शियल जॉईंट व्हेंचर्स आहेत.
ओएसएफ म्हणजे काय?
ओएसएफ म्हणजेच ऑफर ऑफ सेल. शेअर बाजारात लिस्टेड कंपन्यांनामधील आपला हिस्सा कमी करण्यासाठी प्रमोटर्स ओएसएफचा वापर करतात. भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या नियमांनुसार ज्या कंपनीला ओएफएस जारी करायचा असेल त्या कंपनीला यासंदर्भातील सूचना दोन दिवस आधीच सेबीला आणि एनएसई तसेच बीएसईला देणं बंधनकारक असतं. त्यानंतर गुंतवणूकदार एक्सचेंजला यासंदर्भातील माहिती देऊन या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. गुंतवणूकदार कोणत्या किंमतीला शेअर्स खरेदी करु इच्छितात यासंदर्भात त्यांनी माहिती देणं बंधनकारक असतं. गुंतवणूकदार शेअर्ससाठी बोली लावतात. त्यानंतर या सर्व प्रस्तावित रक्कमेची मोजणी केली जाते आणि त्यावरुन इश्यू किती सबस्क्राइब झाला आहे हे समजते. त्यानंतर पुढील टप्प्यामध्ये शेअर्सच्या स्कॉटचे अलॉटमेंट केलं जातं.
News English Summary: The government will sell up to 15 per cent stake in state-run aerospace and defence company Hindustan Aeronautics (HAL) through an offer for sale (OFS), at a floor price of Rs 1,001 per share. The offer could fetch the exchequer around Rs 5,020 crore.
News English Title: Hindustan Aeronautics Limited HAL Government Of India Plans Stake Sale Via OFS Offer For Sale News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा