17 March 2025 7:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, शेअर्स प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK Rattan Power Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ आला पेनी स्टॉक, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, शेअर प्राईस 42 रुपये, मिळेल 56% परतावा - NSE: IRB Horoscope Today | 18 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस, तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 18 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या GTL Infra Share Price | शेअर प्राईस 1 रुपया 49 पैसे, 492% परतावा देणारा पेनी स्टॉक फोकसमध्ये - NSE: GTLINFRA TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, एचएसबीसी ब्रोकरेजकडून BUY रेटिंगसह टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS
x

Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस

Bank Account Alert

Bank Account Alert | प्रत्येक व्यक्तीच्या बँक खात्याची वर्षभरात किती रक्कम जमा होईल याची एक लिमिट असते. ही लिमिट वेगवेगळ्या बँकांची वेगवेगळी असू शकते. समजा एका वर्षात तुमच्या खात्यात 10 लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली तर, तुम्हाला आयकर विभागाकडून एक नोटीस पाठवण्यात येते. या गोष्टी कायदेशीररित्या हाताळल्या जातात. त्याचबरोबर योग्य जाचपडताळणी देखील केली जाते. त्यामुळे तुमच्याजवळ योग्य पुरावे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

1. ज्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये एकाच वर्षात दहा लाखांची रक्कम जमा होत असेल तर, तुम्ही फार मोठ्या अडचणीत येऊ शकता. आयकर विभागाकडून सर्व प्रकारची चौकशी केली जाते. त्यामुळे तुम्ही योग्य पुरावे ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. पुराव्यामुळे तुम्ही कोणत्याही चुकीच्या पद्धतीने पैसे कमवत नाही आहात याची शाश्वती बँकेला येते.

2. तुमच्या खात्यात वर्षभरात मर्यादेपेक्षा जास्तीची रक्कम जमा झाल्यास तुम्हाला योग्य ते पुरावे गोळा करावे लागतील. समजा तुम्ही पुरावे गोळा करण्यात यशस्वी ठरलात तर, तुमच्यावर कायदेशीररित्या कारवाई देखील करण्यात येऊ शकते.

3. समजा तुम्ही पुरावे जमा करू शकला नाहीत तर, तुमच्यावर योग्य ती कारवाई केली जाईलच सोबतच तुमचे बँक खाते देखील गोठवले जाईल. या कारणामुळे तुम्हाला रोख रक्कम जमा करताना पुरावे देखील गोळा करून ठेवायचे आहेत. असं केल्याने तुम्ही कोणत्याही अडचणीत सापडणार नाही.

4. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ही नेमके पुरावे कोणत्या गोष्टीचे जमा करायचे. तर, समजा तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये काम करत आहात किंवा एखाद्या संस्थेला सेवा पुरवत आहात तर, त्यासंदर्भात तुमच्या खात्यात एखाद्या व्यक्तीने रोख रक्कम पाठवली असेल तर, त्याचे संपूर्ण कागदपत्र तयार ठेवा. जेणेकरून तुम्ही कोणत्याही अडचणीत येणार नाही.

5. संपूर्ण एका वर्षात तुमच्या खात्यात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली तर, आयकर विभाग तुमची शंभर टक्के चौकशी करेल असं नाही परंतु, एकाच दिवसात 2 लाखांची रक्कम जमा झाली तर मात्र तुम्ही अडचणीत येऊ शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bank Account Alert Monday 23 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bank Account Alert(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x