22 April 2025 9:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

CIBIL Score | कोलमडलेला सिबिल स्कोर सुधारण्यासाठी वापरा या 5 ट्रिक्स; 700 हून अधिक सिबील स्कोर असण्याचे फायदे जाणून घ्या

CIBIL Score

CIBIL Score | व्यक्तीची आर्थिक परिस्थिती चांगली आहे की नाही हे दर्शवण्यासाठी सिबिल कोरची चांगली मदत होते. सिबिल स्कोर हा एक तीन अंकी क्रमांक असतो जो 300 ते 900 रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळतो. तुमचा सिबिल स्कोर 500 ते 900 च्या दरम्यान म्हणजे 750 आकड्यापर्यंत असेल तर, तुम्ही अतिशय शिस्तबद्ध तुमची बिले आणि पेमेंट वेळेवर भरत आहात हे यामधून दिसून येतं.

सिबिल स्कोरमधून व्यक्तीच्या आर्थिक स्थितीचा अंदाज बांधता येतो. सिबिल स्कोर तुम्हाला पुन्हा कर्ज द्यायचे की नाही हे ठरवण्यासाठी देखील उपयुक्त ठरतो. तुमची मागील कामगिरी म्हणजेच तुम्ही तुमचे पूर्वीचे कर्ज आणि इतर कोणत्याही पेमेंट वेळेवर भरले आहे की नाही. त्याचबरोबर कुठलीही थकबाकी तर नाही ना या सर्व गोष्टींची पूर्तता केली जाते आणि मगच तुम्हाला बँकांकडून किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळणार की नाही हे निश्चित केलं जातं.

क्रेडिट कार्डचे पेमेंट भरणे देखील आहे महत्त्वाचे :
तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर कोलमोडू द्यायचा नाहीये किंवा कोलमडलेल्या सिबिल स्कोर सुधरवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर, तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डचे पेमेंट वेळेवर भरावे लागेल. त्याचबरोबर क्रेडिट कार्डची दिलेली लिमिट पाळली नाही तरीही तुमचा स्कोर घसरणीला लागतो. त्याचबरोबर एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं अशा पद्धतीने वारंवार कर्ज घेऊन देखील तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची सीमा खराब करत असता. याच कारणामुळे तुमचा सिबिल स्कोर सुधारत नाही.

700 पेक्षा अधिक असलेल्या सिबिल स्कोरचे नेमके फायदे काय :
1. 700 पेक्षा सर्वाधिक क्रेडिट स्कोर म्हणजेच सिबिल स्कोर असल्याचे ग्राहकांना प्रचंड फायदे अनुभवायला मिळतात. त्यामधील पहिला फायदा म्हणजे तुम्हाला मंजूर होणारे कर्ज हे व्याजदर आणि मंजूर झालेले असते.

2. त्याचबरोबर 700 पेक्षा अधिक सिबिल स्कोर असलेल्या व्यक्तींना वित्तीय संस्थांकडून किंवा बँकांकडून अगदी कमीत कमी व्याजदरात कर्ज मंजुरी केली जाते.

3. 700 हून अधिक सिबिल स्कोर असलेला व्यक्ती बँकांच्या किंवा वित्तीय संस्थांच्या नजरेमध्ये एक शिस्तबद्ध पैशांचे नियोजन करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत पाहिले जाते. तुम्ही बँकेला अगदी हमीपूर्वक घेतलेले कर्ज अगदी व्याजासकट परत कराल असा विश्वास बँकांना वाटतो.

4. तुमचा सिबिल स्कोर वाढत गेल्यानंतर आणि क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरल्यानंतर बँकांकडून तुम्हाला उच्च मर्यादेचे क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले जाते.

सिबिल स्कोर सुधारण्यासाठी काय करावे :
1. सिबिल स्कोर सुधारण्यासाठी तुम्ही घेतलेल्या कर्जाचे किंवा उर्वरित कोणत्याही पेमेंटची थकबाकी रक्कम भरावी लागेल.

2. सर्व बिले आणि पेमेंट वेळेवर भरून तुम्ही तुमचा सिबिल स्कोर सुधारवण्याचा प्रयत्न करू शकता. जे व्यक्ती वेळेवर त्यांचे कर्ज फेडत नाहीत त्यांचा सिबिल स्कोर घटतो आणि भविष्यात कर्ज मिळवण्यास अडचणी देखील निर्माण होतात.

3. त्याचबरोबर सिबिल स्कोर सुधारण्याकरिता क्रेडिट कार्डचा वापर देखील कमीत कमी प्रमाणात केला पाहिजे. तुमच्या क्रेडिट कार्डचा खर्चाची लिमिट 1 लाख रुपये असेल तर तुम्ही लिमिटच्या अगदी 30 ते 40% पर्यंत रक्कम खर्च केली पाहिजे. त्यापेक्षा अधिक रक्कम खर्च केली गेली तर, याचा थेट परिणाम तुमच्या सिबिल स्कोरवर होताना पाहायला मिळतो.

अशा पद्धतीने चेक करा तुमचा सिबिल स्कोर :
सिबिल स्कोर तपासण्यासाठी तुम्ही कोणतीही वित्तीय संस्था किंवा सिबिलच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासू शकता. असे बहुतांश ॲप्स आहेत त्याचबरोबर डिजिटल पेमेंट करून देखील तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर तपासण्याची संधी मिळते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्रेडिट स्कोर त्याचबरोबर सिबिल स्कोर प्रत्येक वर्षाला तपासून पाहायला हवा. जेणेकरून आपल्याला स्वतःच्या आर्थिक घडामोडींची माहिती वेळोवेळी मिळत राहते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | CIBIL Score Saturday 08 February 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CIBIL Score(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या