30 April 2024 12:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC सह हे टॉप 10 शेअर्स खरेदी करा, ट्रेडिंग व्हॉल्यूम विक्रम तोडत आहेत, मोठी कमाई होईल IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार? Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स आता सुसाट तेजीच्या दिशेने, तज्ज्ञांकडून स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राइस जाहीर Infosys Share Price | इन्फोसिस आणि TCS सह 7 IT शेअर्स मालामाल करणार, मिळेल 39 टक्केपर्यंत परतावा SBI Mutual Fund | अशी म्युच्युअल फंड योजना निवडा, अवघ्या 25 हजार रुपयांची गुंतवणूक देईल 16 लाख रुपये परतावा Guru Rashi Parivartan | 'या' 4 भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे? 1 मे पासून गुरू रशिपरिवर्तन नशीब बदलणार Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

Adani Group Shares | अदानी ग्रुपच्या आणखी दोन कंपन्यांना दणका, MSCI इंडिया इंडेक्स मधून काढले बाहेर, कोणते शेअर्स?

Adani Group Shares

Adani Group Shares | अदानी समुहाला आणखी एक दणका बसला आहे. अदानी समूहाचा भाग असलेल्या ‘अदानी ट्रान्समिशन’ आणि ‘अदानी टोटल गॅस’ या दोन्ही कंपन्या एमएससीआय इंडिया इंडेक्समधून बाहेर पडणार आहे. 31 मे 2023 पासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. ही बातमी जाहीर होताच ‘अदानी टोटल गॅस’ आणि ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरले.

शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 812.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीचे शेअर्स 4 टक्के घसरणीसह 882 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

एमएससीआयने अदानी समुहाच्या दोन कंपन्याबाबत केलेली घोषणा अदानी समूहासाठी मोठा धक्का मानला जात आहे. हिंडेनबर्ग अहवालानंतर, अदानी समूह बाजारात गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. ग्लोबल इंडेक्स फर्मने तिमाही व्यापक निर्देशांक पुनरावलोकनाचा भाग म्हणून अदानी समूहाच्या या दोन कंपन्यांना MSCI मधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च फर्मच्या मते, एमएससीआय ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समधून अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅस कंपन्याच्या बाहेर पडल्यामुळे त्यांना अनुक्रमे 201 दशलक्ष डॉलर्स आणि 186 दशलक्ष डॉलर्सचे निर्गमन होऊ शकते.

कंपन्यांचे शेअर्स 5 टक्के खाली :
अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के लोअर सर्किटसह 812.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स 4 टक्के घसरणीसह 882 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. याशिवाय अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 2 टक्के घसरणीसह 1951.45 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. Hindenburg फर्मच्या अहवालामुळे झालेल्या नुकसानीतून अदानी समूह अजून सावरला नाही आहे.

हिंडेनबर्ग रिसर्च फर्मच्या अहवालानंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश झाले होते. या धक्क्यातून अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स अजून सावरलेले दिसत नाहीत. अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स 24 जानेवारी 2023 च्या किंमत पातळीपेक्षा 68 टक्के खाली ट्रेड करत असून अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 24 जानेवारीच्या किंमत पातळीपेक्षा 80 टक्के खाली ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Group Shares today on 13 May 2023.

हॅशटॅग्स

#Adani Group Shares(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x