27 March 2025 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TATA Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स जबरदस्त घसरले, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS Reliance Power Share Price | 39 रुपयांच्या रिलायन्स पॉवर शेअरबाबत अपडेट, आनंद राठी ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: RPOWER Adani Power Share Price | ICICI सिक्युरिटीज बुलिश, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ADANIPOWER PPF Scheme Investment | हमखास गॅरेंटेड 34,36,005 रुपये परतावा देईल PPF योजना, बिनधास्त बचत करा, फायदाच फायदा EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांच्या खात्यात EPF चे 86,90,310 रुपये जमा होणार, तुमचा पगार किती? फायद्याची अपडेट Mirae Asset Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको? फक्त 11 महिन्यात 103% परतावा देतोय हा फंड, संधी सोडू नका 8th Pay Commission | 8वां वेतन आयोग केव्हा लागू होणार? पेंशनर्स अणि कर्मचाऱ्यांना होणार फायदा, रक्कम जाणून घ्या
x

CIBIL Score | 'या' 6 सोप्या स्टेप्समुळे तुमचा सिबिल स्कोर भराभर वाढवेल, 500 हून थेट 800 चा आकडा गाठेल, असं शक्य होइल

CIBIL Score

CIBIL Score | तुमचा पैकी बऱ्याच व्यक्तींनी आतापर्यंत कर्ज देण्यासाठी बँकेमध्ये धाव घेतली असेल. कर्ज घेताना बँक तुमच्याकडून तुमचा सिबिल स्कोर मागते. सिबिल स्कोर हा एक अशा पद्धतीचा तीन अंकी आकडा असतो ज्याच्या माध्यमातून तुम्हाला बँकांकडून किंवा कोणत्याही वित्तीय संस्थांकडून कर्ज मंजूर होते.

सध्या व्यक्ती कोणतीही वस्तू खरेदी करताना कर्ज घेतो. यामध्ये महागडी मोबाईल, घरातील मोठमोठे उपकरणे, टीव्ही, फ्रिज, वॉशिंगमशीन या वस्तूंचा समावेश होतो. तुम्ही मोठा घर खरेदी करा किंवा लॅपटॉपप्रमाणे छोट्या वस्तूंची खरेदी करा कोणत्याही गोष्टीचे कर्ज घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर तपासल्याच जातो. अगदी तुम्ही वैयक्तिक कर्ज जरी घेत असाल तरीसुद्धा बँक किंवा वित्तीय संस्था तुमचा सिबिल स्कोर तपासते आणि तुम्हाला किती प्रमाणात कर्ज द्यायचे आणि व्याजदर निश्चित करायचे हे ठरवते.

उत्तम सिबिल स्कोर कितीपर्यंत असतो :
सिबिल स्कोरचा रेश्यो हा 300 ते 900 च्या दरम्यान पाहायला मिळतो. जर तुमचा स्कोर 500 किंवा त्याहून खाली असेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनाच्या बाबतीत अगदी बेशिस्त आणि नियोजनबद्ध नसल्याचं दिसून येतं. याच्या अगदी उलट तुम्ही वेळेवर बिले आणि पेमेंट भरत असाल, क्रेडिट कार्डचा हप्ता देखील वेळेवर भरत असाल तर, तुमचा सिबिल स्कोर 750 किंवा त्याहून अधिक बनत जातो.

ज्यावेळी ग्राहकाचा सिबिल स्कोर 750 किंवा त्याहून अधिक असतो तेव्हा त्याला अधिकचे व्याजदर देखील मंजूर होते. नियोजनबद्ध व्यक्तींकडून बँका आणि वित्तीय संस्था कमीत कमी व्याजदर वसूलतात. अगदी उलट्या परिस्थितीत ज्या व्यक्तींचा स्कोर अतिशय डाऊन असतो त्यांना बँकांना जास्तीचे व्याजदर द्यावे लागते. या सर्व गोष्टींमध्ये व्यक्ती कर्जामुळे जास्तीत जास्त पिळून निघतो आणि आणखीन कर्जबाजारी होतो.

कोणत्या 6 गोष्टींमुळे तुम्ही तुमचा सिबिल स्कोर सुधरवू शकता :
1. समजा तुम्ही एखाद्या कर्ज काढलेल्या व्यक्तीचे जामीनदार असाल आणि त्या व्यक्तीने वेळेवर कर्ज भरले नाही आणि भरपूर हफ्ते थकवले तर, त्याचा थेट परिणाम त्याच्या सिबिल स्कोरवर होताना पाहायला मिळतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा जामीनदार बनण्याचा प्रयत्न करत असाल तर सर्वप्रथम त्याची कर्ज फेडण्याची क्षमता चांगली आहे की नाही याची माहिती करून घ्या.

2. काही व्यक्ती आपल्या चालू क्रेडिट कार्डवर कर्ज घेऊन मोठी चूक करतात. असं केल्याने तुमच्या सिबिल स्कोरवर परिणाम होतो. तुम्ही तुमच्या चालू क्रेडिट कार्डवर अजिबात कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नका. सोबतच तुमच्याजवळ जुने क्रेडिट कार्ड असेल तर, ते बंद करण्याचा विचार देखील करू नका. जुने क्रेडिट कार्ड बंद केल्यानंतर तुमचा सिबिल स्कोर ढासळू शकतो.

3. क्रेडिट स्कोर वारंवार तपासणी देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यावेळी तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर वारंवार तपासता तेव्हा तुमचा स्कोर नेमका किती आहे याची तुम्हाला माहिती मिळते आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या आर्थिक खर्चाचे नियोजन करून वेळेवर बिले भरण्याचा प्रयत्न करू शकता. एवढंच नाही तर तुमच्या नावाने इतर कोणताही व्यक्ती कर्ज घेऊन थकबाकी ठेवत तर नाही आहे ना या गोष्टीची माहिती देखील तुम्हाला सिबिल स्कोरची तपासणी केल्यानंतर मिळते.

4. काही लोक गरजेपेक्षा जास्त कर्ज घेतात आणि नंतर कर्जबाजारी होऊन बसतात. ते कर्ज व्यवस्थीत फेडता देखील येत नाही. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर घसरत जातो आणि म्हणूनच जेवढे लागते तेवढेच कर्ज घ्या.

5. बऱ्याच व्यक्तींना एकाच वेळेला अनेक कर्ज घेण्याची सवय असते. असं अजिबात करू नका जोपर्यंत तुमचं पहिलं कर्ज फिटत नाही तोपर्यंत दुसरं कर्ज घेण्याच्या भानगडीत पडू नका. त्याचबरोबर क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर, क्रेडिट कार्डची बिले देखील वेळेवर भरण्याचा प्रयत्न करा.

6. समजा तुम्ही तुमच्या घरातील काही वस्तू EMI वर खरेदी केल्या असतील तर, वस्तूंचे EMI हफ्ते वेळेवर भरण्याचा प्रयत्न करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | CIBIL Score Sunday 02 February 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CIBIL Score(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या