27 March 2025 11:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 39 रुपयांच्या रिलायन्स पॉवर शेअरबाबत अपडेट, आनंद राठी ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: RPOWER Adani Power Share Price | ICICI सिक्युरिटीज बुलिश, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ADANIPOWER PPF Scheme Investment | हमखास गॅरेंटेड 34,36,005 रुपये परतावा देईल PPF योजना, बिनधास्त बचत करा, फायदाच फायदा EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांच्या खात्यात EPF चे 86,90,310 रुपये जमा होणार, तुमचा पगार किती? फायद्याची अपडेट Mirae Asset Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको? फक्त 11 महिन्यात 103% परतावा देतोय हा फंड, संधी सोडू नका 8th Pay Commission | 8वां वेतन आयोग केव्हा लागू होणार? पेंशनर्स अणि कर्मचाऱ्यांना होणार फायदा, रक्कम जाणून घ्या Horoscope Today | 27 मार्च 2025; तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल, गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Home Loan EMI | वयाच्या 40 व्या वर्षी गृहकर्ज घेण्याचा प्लॅन करताय, मग, या 4 गोष्टी लक्षात ठेवा, कर्जाचा डोंगर हलका होईल

Home Loan EMI

Home Loan EMI | जगातील प्रत्येक व्यक्तीचा स्वप्न असतं की, आपणही आपल्या घराची स्वप्नपूर्ती साकार करावी. आपण आपल्या कुटुंबीयांसाठी एखादं चांगलं घर बुक करावं. यासाठी काहीजण आपल्या आयुष्याची संपूर्ण जमापुंजी खर्च करतात. तर, काहीजण कर्जाद्वारे गृहकर्ज घेतात आणि घर घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु गृह कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय जास्त असेल तर, कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था त्या व्यक्तीला गृह कर्ज देण्याआधी 100 वेळा विचार करते.

जास्त वयात कर्ज फेडता येणार नसल्याकारणाने बँका जास्त वय असलेल्या व्यक्तींना कर्ज देत नाहीत. कारण की अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर कर्ज फेडण्याच्या नादात तुमचे EMI जास्त प्रमाणात वाढलेले असते. परंतु एका मोठ्या बँकेने दिलेल्या काही टिप्समुळे तुमचे जास्त वय असले तरीसुद्धा तुम्हाला गृहकर्जासाठी अप्लाय करता येणार आहे. 40 किंवा त्याहून अधिक वय असले तरीही तुम्हाला घर खरेदी करता येऊ शकते. त्याचबरोबर तुमच्या डोक्यावर कर्जाचे ओझे देखील निवडून गेल्यासारखे वाटेल. या सर्व गोष्टी कशा पद्धतीने शक्य होतील हे आज आपण जाणून घेऊया.

जॉईंट होम लोन :
तुम्हाला तुमच्या 40 व्या वर्षी घर खरेदी करायचं असेल आणि त्याकरिता गृहकर्ज घ्यायचे असेल तर, ते अगदी सहज शक्य आहे. यासाठी तुम्ही जॉईंट होम लोनचा पर्याय निवडू शकता. तुम्ही आणि तुमची पत्नी दोघेही पगार घेत असाल तर तुम्ही संयुक्त कर्जाच्या मार्फत लोन घेऊ शकता. अशा परिस्थितीत तुम्हाला जास्तीचे लोन प्रदान होऊ शकते आणि तुम्हाला व्याजदराचे ओझे देखील वाटणार नाही. त्यामुळे जॉईंट होम लोन घेण्याचा पर्याय तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.

डाऊन पेमेंटची रक्कम वाढवा :
तुम्हाला घराची स्वप्नपूर्ती साखर करायची असेल आणि त्यासाठी तुम्ही गृह कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, सर्वप्रथम डाऊन पेमेंटची रक्कम वाढवा. डाऊन पेमेंटची रक्कम वाढवल्यामुळे तुम्हाला कर्जाची रक्कम जास्त वाटणार नाही आणि तुमचे कर्ज पटापट फिटले जाईल.

एकरक्कमी कर्ज भरण्याचा प्रयत्न करून पहा :
कर्ज परतफेडीचा कालावधी आणि तुमच्या रिटायरमेंटचा कालावधी एकच असेल तर अत्यंत बरं होईल. अशा परिस्थितीत तुम्ही नोकरीवर असतानाच तुमचे कर्ज पूर्णपणे संपून जाईल आणि तुम्ही कर्जाच्या जाळ्यातून मुक्त व्हाल. यासाठी तुम्हाला एक शक्कल लढवावी लागेल. तुम्हाला मिळणारा बोनस किंवा ग्रॅच्युईटीची रक्कम त्याचबरोबर निवृत्तीनंतर देखील अनेकांना एक रक्कमी रक्कम हातात मिळते. हीच रक्कम तुम्ही एका जमात कर्ज फेडण्याचा प्रयत्न करून पाहू शकता. अशा परिस्थितीत लवकरात लवकर तुमची रूम तुमच्या ताब्यात येईल.

कर्ज रीपेमेंटचा कालावधी वाढवा :
बहुतांश बॅंका कमीतकमी 30 वर्षांचा कालावधी कर्ज परतफेडसाठी देतात. समजा तुम्ही तुमच्या वयाच्या 40 व्या वर्षी कर्ज घेतलं तर, पुढील 30 वर्षापर्यंत तुम्ही नक्कीच सेवानिवृत्त होता. अशा परिस्थितीत तुम्हाला बँकेला पटवून द्यायचे आहे की, तुमची नोकरी पक्की आहे आणि निवृत्त झाल्यानंतर देखील तुम्ही अगदी कोणतीही अडचण न येता कर्जाची रक्कम फेडू शकता. बँकेची अगदी पद्धतशीरपणे डील करून घेतल्यानंतर तुम्हाला कर्ज फेडण्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Home Loan EMI Sunday 02 February 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Home Loan EMI(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या