
CIBIL Score | नोकरीपेशा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सिबिल स्कोर 700 ये 900 या आकड्या दरम्यान असणे महत्त्वाचे आहे. कारण की एक उत्तम सिबिल स्कोर तुम्हाला आणि अडचणीच्या काळात किंवा एनीटाईम लोन देण्यास सज्ज असतो.
सिबिल स्कोरमार्फत तुमची रिपेमेंट हिस्ट्री देखील समजली जाते. त्याचबरोबर तुमचा चांगला सिबिल स्कोर तुम्ही किती चांगल्या प्रकारे बँकेचे लोन परतफेड करू शकता हे दर्शवते. ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर अत्यंत कमी असतो त्यांना बँकेकडून लोन मिळण्यास अमंजुरी मिळते. तुम्हाला बँकेकडून कमी दरात लोन मिळणार की तुमच्याकडून जास्तीचे व्याजदर उकळले जाणार हे देखील तुमच्या चांगल्या सिबिल स्कोरवर आधारित असते. तुम्हाला देखील तुमचा सिबिल स्कोर चांगला बनवायचा असेल तर, या 5 गोष्टी फॉलो करा.
1. लोन गॅरेंटर :
तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर खराब करून घ्यायचा नसेल तर, लोन गॅरेंटर बनताना विचारपूर्वक बना. शक्यतो जो व्यक्ती कधीही घेतलेलं कर्ज वेळेवर फेडू शकणार नसेल अशा व्यक्तीचे लोन गॅरेंटर बनने अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही एका विश्वासहार्य व्यक्तीला मदत केली पाहिजे.
2. क्रेडिट कार्डची लिमिट :
बऱ्याच व्यक्तींना क्रेडिट कार्डची लिमिट वारंवार वाढवण्याची गरज भासते. परंतु असं करणं अत्यंत चुकीचं आहे. क्रेडिट कार्डची लिमिट एका लिमिटपर्यंत वाढवा. वारंवार लिमिट वाढवल्यामुळे तुम्ही अति प्रमाणात पैसे खर्च करत आहात ही बाब दिसून येते.
3. क्रेडिट कार्डचा उपयोग :
चांगला सिबिल स्कोर तयार करण्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्डचा वापर देखील अत्यंत सावधानीने करायला हवा. तुम्हाला ज्या लिमिटमध्ये क्रेडिट कार्ड दिले आहे त्याच लिमिटपर्यंत पैसे खर्च करा. तुम्ही लिमिट क्रॉस केली तर तुमच्या सिबिल स्कोरवर याचा थेट परिणाम होताना पाहायला मिळेल. तुम्ही केवळ 30% टक्क्यांपर्यंत क्रेडिट कार्डचा वापर केला पाहिजे.
4. EMI आणि सर्व बिले वेळेवर पेमेंट करा :
आपण बरेचदा काही वस्तू EMI वर देखील खरेदी करतो. अशावेळी तुम्ही तुमचे EMI वेळेवर भरणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर याचा थेट परिणाम तुमच्या सिबिल स्कोरवर पाहायला मिळेल. एवढेच नाही तर, EMI वेळेवर आणि ठरलेल्या तारखेलाच भरावे लागते अन्यथा तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो.
5. अनेक लोन घेणे :
तुम्ही एका वस्तूसाठी कर्ज घेतले असेल तर, ते कर्ज पूर्ण फेडल्यानंतरच दुसरं कर्ज घ्या. एकाच वेळेला अनेक लोन घेतल्यामुळे तुमच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ शकते. या कारणामुळे देखील तुमचा सिबिल स्कोर पूर्णपणे खराब होतं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.