14 September 2024 8:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची ब्रेकआऊट लेवल टेस्टिंग, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला - Marathi News EPF On Salary | पगारदारांसाठी खुशखबर! 50 हजाराच्या पगारावर EPF अकाउंटमध्ये 2.53 करोड रुपये जमा होणार - Marathi News HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL सहित या 5 डिफेन्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा NBCC Share Price | 229% मल्टिबॅगर परतावा देणारा NBCC शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Senior Citizen Saving Scheme | योग्य ठिकाणी पैसे गुंतवा आणि दरमहा कमवा 20,000; योजनेची पूर्ण डिटेल्स - Marathi News IREDA Share Price | PSU शेअर मालामाल करणार, स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट आली - Marathi News Smart Investment | लेकीसाठी गुंतवा फक्त रु.10,000; परतावा रक्कम मिळेल 55.61 लाख रुपये, आजच फॉर्म भरा - Marathi News
x

Controlling Anger | तुम्ही सुद्धा राग मनामध्ये दाबून शांत राहण्याचा प्रयत्न करताय? आरोग्यावर 'हे' गंभीर परिणाम होतात

Controlling Anger

Controlling Anger | राग ही एक अशी भावना आहे ज्यामधून तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर विरोध दर्शवता. प्रत्येक व्यक्तीला एखाद्या व्यक्तीचा कोणत्या ना कोणत्या कारणावरुन राग येणे हे स्वाभाविक आहे. काही व्यक्ती मनामधे राग न ठेवता समोरच्याच्या तोंडवर बोलून मोकळे होतात. परंतु असे अनेक व्यक्ती आहेत जे त्यांचा राग मनामधे साठवून ठेवतात आणि शांत राहण्याचा प्रयत्न करतात. असं करणं अत्यंत चुकीचं आहे. असं केल्याने तुम्हाला काही वाईट परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

मनामध्ये राग साठवून ठेवणाऱ्या व्यक्तींना काही काळानंतर शारीरिक किंवा मानसिक तणाव येऊ शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्गच्या संशोधकांनी असे नमूद केले आहे की, ज्या व्यक्ती मनामध्ये राग दाबून ठेवतात त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. सोबतच त्यांना स्ट्रोकच्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे अशा व्यक्तींनी मनामध्ये राग साठवून स्वतःचे मानसिक नुकसान करणे बंद केले पाहिजे.

राग व्यक्त न केल्याने नुकसान
1. उच्च रक्तदाब :
ज्या व्यक्ती राग मनामध्ये साठवून ठेवतात आणि व्यक्त होणे टाळतात त्यांना सर्वप्रथम उच्च रक्तदाबाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. ज्यामुळे ब्रेन स्ट्रोक देखील होऊ शकते. ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीला प्रतिसाद करतो किंवा त्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये जोरदार वेगाने रक्त प्रवाह सुरू असतो. त्यामुळे हायबीपीची समस्या उद्भवू शकते.

2. शरीरात होणाऱ्या हालचाली :
जर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर, तुम्हाला लवकरात लवकर चेस्ट पेन, तीव्र डोकेदुखी, उच्च रक्तदाब, त्याचबरोबर ऍसिडिटी आणि अपचन अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्याचबरोबर आपण जेव्हा आपला राग शांत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एड्रीनालिन आणि नोराड्रीनलिन नावाचे हार्मोन्स क्रिएट होतात.

3. डोके दुखणे :
ज्या व्यक्ती राग मनामध्ये ठेवून शांत राहण्याचा प्रयत्न करतात त्यांना हार्ट डिसीजचा सामना करावा लागू शकतो. ज्यामुळे सतत घाम येणे, मायग्रेन आणि अल्सरसारख्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते. त्याचबरोबर अशा व्यक्तींना तीव्र डोकेदुखीचा त्रास देखील सतावत असतो.

4. तणावग्रस्त जीवन :
प्रत्येकवेळी राग मनामध्ये दाबून ठेवल्यावर तुम्हाला स्ट्रेस होऊ शकतो. सतत तणावात राहिल्याने त्या व्यक्तीची झोप कमी होणे, डोके दुखणे, डोळे दुखणे, दुःखी वाटणे अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे मनामध्ये राग न ठेवता तो राग व्यक्त करुन मोळके व्हावे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Controlling Anger effect on health check details on 16 April 2023.

हॅशटॅग्स

#Controlling Anger(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x