 
						Credit Card | बहुतांश व्यक्ती क्रेडिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्ड हे एक अशा पद्धतीचं कार्ड आहे जे तुम्ही कधीही आणि कुठेही अगदी आरामशीर वापरू शकता. बऱ्याच व्यक्ती छोट्या मोठ्या ट्रांजेक्शनसाठी देखील क्रेडिट कार्डचा वापर करतात. तसं पाहायला गेलं तर क्रेडिट कार्डचं कोणताच टेन्शन नसतं परंतु क्रेडिट कार्ड एक्सपायर झालं तर मात्र यूजर शांत बसत नाही. आज या लेखातून आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की, तुमचं क्रेडिट कार्ड एक्सपायर झालं आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचं पेमेंट करण्यास असमर्थ ठरला तर, तुमच्यासोबत पुढे कोणत्या गोष्टी घडू शकतात.
पेंडिंग ड्यूज :
क्रेडिट कार्डची मर्यादा पूर्णपणे संपल्यानंतर आणि क्रेडिट कार्ड एक्सपायर झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचे ट्रांजेक्शन क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करू शकणार नाही. समजा तुमचे पेंटिंग ड्यूज असतील तर सर्वप्रथम तुम्हाला पेमेंट पूर्ण करून घ्यावे लागेल. कारण की क्रेडिट कार्ड ऍक्टिव्ह असते. तसं पाहायला गेलं तर बँक तुम्हाला नवीन क्रेडिट कार्ड देते आणि बाकी असलेले पेमेंट नव्या क्रेडिट कार्डशी जोडते. परंतु या सगळ्यांमध्ये तुमच्या डोक्याला जास्त टेन्शन येऊ शकतं. त्यामुळे क्रेडिट कार्डच्या एक्सपायरी डेटवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
क्रेडिट कार्ड पेमेंट :
क्रेडिट कार्ड पेमेंटबद्दल सांगायचे झाले तर ग्राहक क्रेडिट कार्डवरून ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही वस्तूचे पैसे भरू शकतो. समजा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट करत असाल तर, मोबाईल वॉलेट, नेट बँकिंग आणि यूपीआयसारख्या सुविधांमधून पैसे भरू शकता.
क्रेडिट कार्ड एक्सपायर झाले आहे हे कसं समजेल :
समजा तुम्ही एखाद्या बँकेचं क्रेडिट कार्ड वापरत असाल तर, कार्डच्या समोरच्या भागावर 16 डिजिट कार्ड नंबर किंवा कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीकडे लिहून ठेवलेलं असतं. उदाहरणार्थ, समजा एखाद्या व्यक्ती पंजाब नॅशनल बँकेचं रूपे क्रेडिट कार्ड वापरत असेल तर, त्या कार्डमागे क्रेडिट कार्डची समाप्ती देखील नमूद केलेली असते. त्याचबरोबर आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवर एक्सपायरी डेट असते परंतु समोरील बाजूस छापलेली असते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		