2 May 2025 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल

Credit Score

Credit Score | बँक कोणत्याही व्यक्तीला लोन देण्याआधी सर्वप्रथम त्याचा क्रेडिट स्कोर तसेच सिबिल स्कोर चेक करते. सिबिल स्कोर 700 किंवा 750 च्या लेवलचा असेल तर, त्याला सहजपणे लोन देते. परंतु बऱ्याचदा असं देखील आढळून येते की तुमचा सिबिल स्कोर 750 आहे त्याचबरोबर तुमच्याकडे फायनान्शियल इतरही चांगले गुण आहेत तरीसुद्धा लोन घेण्यास तुम्ही पात्र ठरत नाहीत. त्याचं कारण फार कमी व्यक्तींना ठाऊक आहे. आज आम्ही तुम्हाला बातमीच्या माध्यमातून एका महत्त्वाच्या गोष्टीची सांगड घालून देणार आहोत.

शहर निवड :

तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल की, काही बँका त्याचबरोबर कंपन्या निवडक शहरांमध्ये असतात. जर तुम्ही त्या बँकेकडून कर्ज घेण्यात गेलात आणि तुम्ही मुळातच त्या शहराचे नसाल तर, तुमचे कर्ज नाकारले जाऊ शकते. उदाहरणासाठी समजून घेऊ की, एचएसबीसी या बँकेचे क्रेडिट कार्ड केवळ 14 मोठमोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहे.

विविध प्रकारची कर्ज :

काही व्यक्तींना सवय असते एकाच वेळी अनेक कर्ज घेऊन ठेवतात. त्याचबरोबर एका वेळी अनेक क्रेडिट कार्डसाठी अर्ज देखील करतात. परंतु असं केल्याने बँक तुम्हाला क्रेडिट हंगरची सवय लागली आहे असं समजते आणि तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा कोणतही कर्ज देण्यास नकार देते.

चुकीची कागदपत्रे :

कर्ज घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे केवायसी आणि पत्त्याचा पुरावा. जर तुम्ही या कागदपत्रांमध्ये गल्लत केली असेल तर तुम्ही कर्ज मिळवण्यास अपात्र ठरू शकता.

उत्पन्न आणि वय :

बँक किंवा कर्ज देणाऱ्या कंपन्या सर्वप्रथम तुमचे वय आणि उत्पन्न तपासून पाहतात. जसे की, क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी एचडीएफसी बँकेमध्ये वयाची लिमिट आहे आणि 12000 हजार रुपये मासिक उत्पन्नाची आहे. तुम्ही या नियमांचे उल्लंघन केले किंवा नियमाबद्दल व्यवस्थित माहिती घेतली नाही तर तुम्हाला कर्ज मिळणार नाही.

नोकरी स्थिरता आहे महत्त्वाची :

बँक केव्हाही तुमचे उत्पन्न त्याचबरोबर तुमच्या नोकरीची स्थिरता तपासते. जर तुम्ही वारंवार नोकरी बदलत असाल तर बँकेला तुमची कर्ज परतवण्याची गॅरंटी वाटत नाही. त्यामुळे या कारणामुळे देखील तुमचा कर्ज अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Credit Score 23 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

credit score(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या