9 May 2025 1:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | पडझडीतही गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग - NSE: HAL IRFC Share Price | हा मल्टिबॅगर शेअर ठरू शकतो फायद्याचा, पुढे टार्गेट प्राईस अपेक्षित जाणून घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | मंदीत संधी, स्वस्तात मिळतोय या कंपनीचा शेअर, संयम ठेवल्यास मोठा परतावा मिळेल - NSE: SUZLON 7/12 Utara | कौटुंबिक जमीनीच्या 7/12 वर तुमचं नाव आहे? वारसा हक्काने 7/12 वर नाव जोडण्यासाठी लागतात ही कागदपत्रं SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली
x

EDLI Scheme | पगारदारांना सुखद धक्का; EDLI योजना 3 वर्षांनी वाढली, लाभ घेणे आणखीन झाले सोपे, वाचा सविस्तर - Marathi News

EDLI Scheme

EDLI Scheme | EDLI म्हणजेच ‘एम्प्लॉयीज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स’. ही योजना ईपीएफओ अंतर्गत येते. त्यामुळे केवळ ईपीएफ अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. सध्या अशी माहिती समोर आली आहे की, ईपीएफओने EDLI म्हणजेच ‘एम्पलोयीज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स’ ही योजना आणखीन 3 वर्षांनी वाढवली आहे.

EDLI योजनेचे उद्दिष्टे :

1. EDLI ही योजना 1976 साली सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत अनेकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. सध्या योजनेचा कार्यकाळ 3 वर्षांनी वाढवल्यामुळे ईपीएफओ खातेधारकांना सुखद धक्का बसला आहे.

2. EDLI योजनेचे एकमेव उद्दिष्टे म्हणजे ईपीएफओ अंतर्गत म्हणजे भविष्य कर्मचारी निर्वाह निधी अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मृत्यूनंतर आर्थिक मदत प्रदान करणे होय.

3. विम्याची संपूर्ण रक्कम मृत खातेधारकाच्या कुटुंबीयांना किंवा त्याने केलेला नॉमिनीला मिळते. EDLI योजनेमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी ही योजना राबविली जात आहे.

6 कोटी सदस्यांना होणार फायदा :

EPFO च्या तब्बल 6 कोटी सदस्यांना EDLI योजनेचा फायदा होणार आहे. यामध्ये एकूण 7 लाख रुपयांचा विमा खातेधारकांना देण्यात येतो. EDLI योजनेची वाढ यापूर्वी देखील करण्यात आली. जी 28 एप्रिल 2021 रोजी करण्यात आली होती.

विम्याची संपूर्ण रक्कम ही खातेधारकाच्या पगारावर अवलंबून असते :

अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, कर्मचारी आणि कंपनीकडून खात्यामध्ये योगदान होत असते. तर, यामध्ये EDLI मध्ये पैसे कसे जमा होणार. नियोक्तांकडून ज्या पद्धतीने ईपीएस आणि ईपीएफ खात्यात योगदान केले जाते त्याचप्रमाणे 0.5% टक्क्यांचे योगदान EDLI योजनेत देखील जमा केले जाते. कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर केलेल्या नॉमिनीला विम्याची 20% रक्कम बोनससहित गेल्या 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या तीच पट मिळते. तुम्ही देखील EDLI योजनेचा भाग होऊन आपली आर्थिक स्थिती कोलमडण्यापासून वाचवू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EDLI Scheme Friday 06 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EDLI Scheme(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या