 
						EPF Passbook | कर्मचारी भविष्य निधी संघठनेच्या (EPFO) अंतर्गत अनेक योजना राबविल्या जातात. अशातच सरकारी किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगारामधून ठराविक रक्कम पीएफच्या माध्यमातून बाजूला काढली जाते. जेणेकरून तुमचा ठराविक पगार तुमच्या हातात तर येतो सोबतच नकळतपणे पीएफच्या माध्यमातून कंपनीत थ्रू तुमची सेविंग सुद्धा चालू असते. ही EPFO स्कीम रिटायरमेंट नंतर तुमच्या उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडते.
परंतु काही व्यक्ती एका ठिकाणी नोकरी करत नाहीत. प्रत्येकजण आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी आल्यावर जॉब स्विच करतो. अशावेळी बऱ्याच व्यक्ती अमुक तमुक कंपनीमध्ये साठलेल्या पीएफचे पैसे काढण्यासाठी फॉर्म भरून देणे, त्यांच्या तरतुदी फॉलो करणे या सर्व गोष्टी करतात. परंतु तुम्ही तुमचा पीएफ ट्रान्सफर करून स्वतःची मेंबरशिप वाचवू शकता.
EPF अकाउंट ट्रान्सफर :
जर तुम्ही तुमचं पीएफ अकाउंट ट्रान्सफर केलं तर तुम्हाला कंपाउंड व्याजाचा लाभ घेता येतो. तुमची मेंबरशिप वाया जात नाही आणि तुमचं अकाउंट सातत्याने सुरू राहतं. असं केल्याने तुमच्या अकाउंटमध्ये चांगली रक्कम जमा होऊ लागते. ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये अनुभवायला मिळतो. एवढेच नाही जर तुम्ही तुमचं पीएफ अकाउंट दहा वर्षांपर्यंत ऍक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न कराल तर, भविष्याचा रिटायरमेंट घेतल्यानंतर तुम्हाला पेन्शनचा लाभ देखील मिळू शकतो.
EPF अकाउंट ट्रान्सफर केल्याने होईल मोठा लाभ :
नोकरी बदलल्यानंतर पीएफ अकाउंट ट्रान्सफर करून तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये चांगली रक्कम साठवून ठेवू शकता. जर तुम्ही डायरेक्ट पैसे काढले तर, तुमची मेंबरशिप जाऊन तुम्हाला नव्याने सर्व पैसा साठवावा लागेल. त्यापेक्षा पीएफ ट्रान्सफर करून मालामाल बना.
उदाहरणार्थ, तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये 15 हजार रुपयांपर्यंत पगार भेटत आहे. दरम्यान कंपनी आणि तुम्ही दोघांचे मिळून तुमच्या खात्यात 3,600 रुपये जमा करत असाल आणि तुम्हाला या जमा केलेल्या फंडवर 8.5 टक्क्यांनी व्याज मिळत असेल तर, तुमच्या खात्यामध्ये पुढील पंधरा वर्षांमध्ये तब्बल 12 लाख 94 हजार एवढी रक्कम जमा होईल. त्यामुळे अकाउंट ट्रान्सफर हा तुमच्या भविष्यासाठी एक चांगल्या प्रकारची गुंतवणूक आणि या चांगल्या गुंतवणुकीमुळे मिळणारा रिटर्न फायद्याचा ठरू शकतो.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		