14 May 2025 4:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | तज्ज्ञांकडून ओव्हरवेट रेटिंग जाहीर, हि आहे पुढची अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: BEL HAL Share Price | डिफेन्स शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर, जोरदार खरेदी सुरु, BUY रेटिंग जाहीर - NSE: HAL IREDA Share Price | 49 टक्के रिटर्न मिळेल, पीएसयू शेअर मालामाल करणार, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो या फंडात पैसे गुंतवा, 16 पटीने परतावा मिळतोय, करोडोत रिटर्न मिळेल Mazagon Dock Share Price | रॉकेट तेजीत डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: MAZDOCK Reliance Power Share Price | 43 रुपयाच्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, शॉर्ट टर्ममध्ये मजबूत रिटर्न - NSE: RPOWER Suzlon Share Price | खरेदी करा सुझलॉन स्टॉक, स्वस्तात खरेदीची संधी, मिळेल जरबदस्त परतावा - NSE: SUZLON
x

EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा

EPF Passbook

EPF Passbook | ईपीएफओ म्हणजे ‘कर्मचारी भविष्य निधी संघटन’ कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटसाठी प्रत्येक महिन्याला पगारातील काही भाग EPF म्हणजेच PF खात्यात गुंतवले जातात. नोकरीनंतर कर्मचाऱ्याचं आयुष्य या रिटायरमेंटच्या पैशांतून अतिशय सुखकर जावं यासाठी हा फंड साठवला जातो. कर्मचारी जितके योगदान देतो तितकेच योगदान कंपनी देखील देते.

जमा झालेल्या पैशांवर सरकार चांगले व्याजदर देखील प्रदान करते. आपण आपल्या बँकेच्या आणि कंपनीच्या विश्वासावर पीएफचे पैसे कंपनी वेळोवेळी ईपीएफ खात्यात गुंतवत आहे की नाही हे तपासण्याकडे जास्त लक्ष देत नाही. परंतु काही कारणास्तव तुम्हाला खरंच कंपनी तुमच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा करत आहे की नाही ही गोष्ट तपासायची असल्यास नेमकं काय करावं, तुम्हाला योग्य माहिती कशी मिळेल या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज पाहणार आहोत.

अशा पद्धतीने चेक करा ईपीएफ खात्यातील बॅलेन्स :

1. ईपीएफ खात्यात कंपनी वेळोवेळी पैसे जमा करत आहे की नाही हे तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

2. पुढील प्रोसेस फॉलो करत असताना तुम्हाला ‘For Employees’ या ऑप्शनवर क्लिक करून ‘services’ या ऑप्शनवर देखील क्लिक करायचं आहे.

3. तिसऱ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला ‘Know your EPF Account Balance’ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा UAN नंबर त्याचबरोबर पासवर्ड आणि कॅपच्या कोड देखील टाकायचा आहे.

4. चौथे प्रोसेस म्हणजे तुम्हाला साइन इन करून घ्यायचे आहे आणि लगेचच पासबुक या ऑप्शनवर देखील क्लिक करायचं आहे.

5. समोर असलेल्या स्क्रीनवरून तुम्हाला तुमचे पीएफ अकाउंट निवडायचे आहे आणि ईपीएफ खात्यात किती बॅलेन्स शिल्लक आहे हे तपासायचे आहे.

ईपीएफ बॅलन्स चेक करण्याची ही पद्धत देखील जाणून घ्या :

1. ईपीएफओ कंपनीने खास कर्मचाऱ्यांना घरबसल्या आणि कोणतीही झनझट न करता सोप्या पद्धतीने पीएफ खात्यातील बॅलन्स चेक करता यावा यासाठी 011-22901406 हा नंबर तयार केला आहे. या क्रमांकावर तुम्हाला केवळ एक मिस कॉल द्यायचा आहे आणि लगेचच ईपीएफ खात्यातील बॅलन्स जाणून घ्यायचा आहे.

2. या गोष्टीसाठी तुमचा मोबाईल क्रमांक ईपीएफ खात्याशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे. तरच तुमच्या फोनवर एसएमएस येईल आणि त्याच एसेमेसमध्ये तुमच्या ईपीएफ खात्यातील शिल्लकविषयी माहिती असेल.

3. एवढेच नाही तर तुम्ही एसएमएस करून देखील ईपीएफ खात्यातील बॅलन्स चेक करू शकता. यासाठी तुम्हाला 7738299899 या क्रमांकावर ‘EPFOHO UAN HIN’ हा मेसेज लिहून पाठवायचा आहे. लगेचच तुम्हाला तुमच्या मेसेजचे उत्तर मिळेल. हे उत्तर तुमच्या ईपीएफ खात्यातील बॅलन्सचे असेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPF Passbook Thursday 09 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPF Passbook(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या