1 May 2025 1:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

EPF Withdrawal | पगारदारांनो, आता 50,000 ऐवजी 1 लाख रुपये काढता येतील, EPF ऍडव्हान्स रुल माहित आहे का, जाणून घ्या

EPF Withdrawal

EPF Withdrawal | श्रम मंत्री मनसुख मंडाविया यांनी गरजे वेळी काढण्यासाठीच्या EPF निधीमध्ये वाढ केली आहे. ईपीएफ होल्डर आधी 50,000 हजार रुपयांची रक्कम काढू शकत होता. परंतु आता 50 नाही तर, 1,00,000 लाख रुपयांची रक्कम काढता येणार आहे.

केंद्रीय श्रम मंत्र्यांनी सरकारचे 100 दिवस पूर्ण झाल्यामुळे एक बैठक भरवली होती. या बैठकीतमध्ये केंद्रीय मंत्री मंडसुख मंडावीया यांनी घोषणा केली. त्यांनी ईपीएफओ खातेधारक आता 50 नाहीतर एक लाख रुपयांची रक्कम काढून घेऊ शकतो असं सांगितलं.

केवळ एकच नाही तर अनेक कामे होतील :
त्याचबरोबर मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ईपीएफओ खातेधारक त्याच्या कुटुंबीयांसाठी आजारपणासाठी, लग्नसमारंभासाठी किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी पैसे काढू शकतो. परंतु आता कर्मचाऱ्याला जास्तीचे पैसे काढता येणार आहेत. ज्यामुळे केवळ एकच नाही तर अनेक कामे कर्मचारी करू शकणार आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्याला पैसे काढतीची सुविधा देखील दिली आहे. ती सुविधा नोकरी लागल्यानंतर 6 महिन्यांच्या आत पैसे काढण्याची आहे. त्याचबरोबर एखादा कर्मचारी 6 महिन्यानंतर नोकरी सोडत असेल तर, तो पीएफ खात्यातील पैसे काढून घेऊ शकतो.

आता पैसे काढणे झाले सोपे :
त्याचबरोबर मंत्र्यांनी एका नव्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची सुरुवात करण्याची घोषणा देखील केली. हे स्ट्रक्चर पैसे काढण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते. ज्यामुळे फटाफट पैसे काढण्यास मदत मिळते.

या कामांसाठी काढले जाऊ शकतात पैसे :
ईपीएफ कर्मचाऱ्याला अनेक सुविधा देते. कर्मचाऱ्याला पेन्शनपासून ते मेडिकल केअरपर्यंत सर्व सुविधांचा लाभ मिळतो. अशातच इमर्जन्सी काळात कर्मचाऱ्याला 50 ऐवजी 1 लाख रुपयांची रक्कम काढता येणार आहे. म्हणजेच तुम्ही मेडिकल, लग्न, आजारपण, घर खर्चासाठी, शिक्षणासाठी जास्तीत जास्त पैसे काढू शकता.

अशा पद्धतीने पीएफमधून पैसे काढता येतील :
1. सर्वप्रथम तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर मेंबर सेक्शनमध्ये जाऊन यूएएन नंबर त्याचबरोबर पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्या.
2. लॉगिन करून झाल्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेस या मेनूवर जा. त्यानंतर ड्रॉप डाऊन मेनूमधून क्लेम फॉर्म म्हणजेच पैसे काढण्यासाठीचा फॉर्म 31,19, 10सी आणि.10डी निवडा.
3. आता पैसे काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म 31 निवडायचा आहे. त्यानंतर लिस्टमधून पैसे काढण्याचे स्पष्ट कारण सांगा.
4. त्यानंतर आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला एक ओटीपी पाठवण्यात येईल. आता तुम्हाला तुमचं क्लेम स्टेटस चेक करता येईल.
5. शक्यता हा 7 ते 10 वर्किंग दिवसांत तुमच्या खात्यात ईपीएफओ पैसे ट्रान्सफर करेल.

यावर्षी मिळणार 8.25% व्याजदर :
सध्या कर्मचाऱ्याला ईपीएफओ अंतर्गत 8.25% दरानुसार व्याजदर मिळत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPF Withdrawal 03 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPF Withdrawal(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या