15 March 2025 4:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 16 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी रविवारचा दिवस, तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 16 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | स्वस्तात खरेदी करा डिफेन्स कंपनीचा शेअर, तज्ज्ञांचा सल्ला, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: BEL Suzlon Share Price | मल्टिबॅगर एनर्जी स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईससह BUY रेटिंग जाहीर - NSE: SUZLON Bonus Share News l खुशखबर, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, पोर्टफोलिओ मजबूत करा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, मिळेल मोठा परतावा - NSE: TATAMOTORS IRB Infra Share Price | शेअर प्राईस 42 रुपये, शेअरमध्ये 56% अपसाईड तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: IRB
x

MSSC Scheme | तुमची पत्नी व्याजाने मिळवून देईल 32,000 रुपये, गुंतवा केवळ 2 लाख रुपये, फायद्याची योजना जाणून घ्या

MSSC Scheme

MSSC Scheme | सध्या महिलांच्या सशक्तिकरणासाठी सरकार विविध प्रकारच्या योजना घेऊन येत आहे. अशातच ‘महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट’ ही योजना गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरत आहे. योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला यामध्ये 7.5% दराने व्याजदर प्रदान केले जाते. जे इतर सामान्य योजनांपेक्षा अधिकचे आहे. MSSC योजनेअंतर्गत तुम्ही 2 लाख रुपयांची रक्कम गुंतवू शकता. तुमची पत्नी मॅच्युरिटी पिरियडनंतर तब्बल 2,32,044 रुपयांची मालकीण होईल. योजनेबद्दल आणखीन सविस्तर माहिती जाणून घेऊया.

योजनेची काही खास वैशिष्ट्ये :

1. महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट या योजनेमध्ये भारतीय नागरिक असलेली कोणतीही महिला खाते उघडू शकते. ही योजना तुम्हाला 7.5% दराने व्याजदर प्रदान करते.

2. योजनेचा कार्यकाळ म्हणजेच मॅच्युरिटी टाईम केवळ 2 वर्षांचा असतो. 2 वर्षांमध्ये तुम्हाला 2 लाख रुपयांची रक्कम गुंतवता येते. कमीत कमी गुंतवण्याची रक्कम 1000 रुपये दिली आहे.

3. महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट ही योजना आणखीन एक कारणासाठी खास आहे ती म्हणजे यामध्ये तुम्ही गुंतवणुकीचे 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 40% रक्कम काढून देखील घेऊ शकता.

4. तुम्ही या योजनेचं खातं कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन उघडू शकता आणि लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही अविवाहित असाल तर, तुमच्या आईच्या नावाने देखील पोस्टात किंवा बँकेत जाऊन खातं उघडून घेऊ शकता.

5. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने देखील खातं उघडून गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकता. पुढे तयार होणारा पैसा तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी वापरता येऊ शकतो.

32,000 परतावा कसा मिळवाल :

योजनेबद्दल ही एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या. तुम्ही महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजनेमध्ये 2 लाखांपेक्षा अधिकची रक्कम गुंतवू शकत नाही. तुम्ही योजनेमध्ये 2 लाखांची गुंतवणूक केल्यानंतर 7.5% व्याजदरानुसार 32,044 रुपयांचा परतावा मिळेल. म्हणजेच तुम्हाला मॅच्युरिटीनंतर एकूण 2,32,044 रुपयांची रक्कम परत मिळेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | MSSC Scheme Saturday 18 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MSSC Scheme(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x