18 January 2025 5:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा
x

EPFO Passbook | नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; तुमच्या UAN संबंधित अपडेट जाणून घ्या, अन्यथा नुकसान होईल

EPFO Passbook

EPFO Passbook | ईपीएफ खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ही बातमी UAN एक्टिवेशन संदर्भातली आहे. अजूनही बरेच असे सदस्य आहेत ज्यांनी आपला UAN क्रमांक आधार कार्डशी लिंक केलेला नाहीये. दरम्यान एम्पलोयीज प्रोव्हिडंट फंड म्हणजेच ईपीएफओने नंबर लिंकिंगची तारीख वाढवली आहे. आता जानेवारी महिन्याच्या या तारखेपर्यंत तुम्ही अगदी आरामात तुमचा UAN क्रमांक आधार कार्डशी लिंक करून घेऊ शकता.

UAN एक्टिवेशनची डेडलाईन काय :

ईपीएफओने UAN एक्टिवेशन करण्यासाठी ईपीएफ खातेधारकांना 15 डिसेंबर 2024 ही तारीख अंतिम तारीख म्हणून दिली होती. याआधी ही तारीख 30 नोव्हेंबर 2024 होती. परंतु आता कर्मचाऱ्यांच्या सोईकरिता तारीख पुन्हा वाढवण्यात आली आहे. आता कर्मचाऱ्यांना 2025 वर्षाच्या जानेवारी महिन्यातील पंधरा तारखेपर्यंत UAN क्रमांक आधार कार्डशी लिंक करता येणार आहे.

UAN क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे किती महत्त्वाचे आहे :

1. जो व्यक्ती ईपीएफ कर्मचारी असतो त्याला त्याचे UAN नंबर आधार कार्ड क्रमांकाची लिंक करणे अत्यंत गरजेचे असते.

2. UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर. हा नंबर ऍक्टिव्ह करून आणि आधार कार्डशी लिंक करून ELI योजनेअंतर्गत फायदा घेणाऱ्या व्यक्तींना आणखीन फायदा अनुभवायला मिळतो.

3. लिंकिंगची संपूर्ण प्रक्रिया DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. लिंकिंग प्रोसेसमुळे कर्मचाऱ्यांना जो काही लाभ मिळतो तो थेट बँकेत ट्रान्सफर केला जातो. ज्या कर्मचाऱ्यांनी लिंकिंगची प्रोसेस पूर्ण केली नव्हती त्यांच्यासाठी ही सुविधा आणि वाढवलेली डेड लाईन फायद्याची ठरू शकते.

ELI 2024 :

ELI 2024 म्हणजेच वित्तमंत्री निर्मला सितारामण यांनी 2024 ला जुलै महिन्यात ELI योजनेची निर्मिती केली होती. आर्थिक बजेटमध्ये ELI ची घोषणा करण्यात आली होती. ELI चे एकमेव उद्दिष्टे म्हणजे कर्मचाऱ्यांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभासाठी मदत करणे आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Passbook Friday 10 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x