
Loan EMI Alert | प्रत्येक व्यक्तीला आर्थिक अडचणी येत असतात. आर्थिक अडचणींवर मात करणे सोपे नसते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे संकट ओढावल्यानंतर व्यक्ती सर्वप्रथम बँकेत वैयक्तिक कर्ज घेण्याकडे धाव घेतो. तसं पाहायला गेलं तर बँकेत जाऊन विविध प्रकारचे कर्ज घेता येतात. त्यामध्ये होम लोन, कार लोन, वैयक्तिक लोन यांसारख्या विविध कर्जांचा समावेश असतो. तुम्ही देखील कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
कर्ज घेण्याची गरज :
कर्ज घेताना प्रत्येक व्यक्तीने एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे ती म्हणजे अनावश्यक खर्च म्हणजेच कर्ज घेण्यासाठी शुल्लक कारण असेल तर, कर्ज न घेतलेलं बरं. याउलट शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज, घरासाठी गृह कर्ज, संकटकाळी आपत्कालीन कर्ज घेण्यासाठी तुम्ही कर्ज घेण्याचा विचार नक्कीच करू शकता. कारण की या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेता तुम्ही तुमच्या गरजेनुसारच कर्जाची रक्कम निश्चित करावी.
लोन रक्कम आणि परतफेडचा कालावधी निश्चित करून घ्या :
कर्ज घेण्याआधी तुम्ही तुमच्या कर्जाची रक्कम आणि हे कर्ज किती वेळात फेडणार याचा नियमित कालावधी निश्चित करून घ्या. तुम्ही घेतलेले लोन जेवढे कमी असेल तेवढेच कमी तुम्हाला ईएमआय भरावे लागेल. त्याचबरोबर कर्जाचा कालावधी दीर्घकाळाचा असेल तर, तुम्हाला ईएमआय कमी भरावा लागला तरीसुद्धा व्याजदराचे पैसे जास्तीचे द्यावे लागतील.
व्याजाची तुलना करणे गरजेचे :
कर्ज घेताना केवळ एकच नाही तर विविध बँकांमध्ये जाऊन व्याजदरा विषयीची चौकशी करा. तुम्हाला ज्या ठिकाणी कमीत कमी व्याजदर त्याच बँकेतून कर्ज घेण्याचा विचार करा. असे गेले तर तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचण्यास मदत होईल.
क्रेडिट स्कोर तपासा :
कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना सर्वप्रथम तुमचा क्रेडिट स्कोर म्हणजेच सिबिल स्कोर तपासला जातो. त्यामुळे कर्ज घेताना क्रेडिट स्कोरची मुख्य भूमिका असते. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर कधीही ढासळणार नाही याकडे लक्ष द्या. अन्यथा तुम्हाला कोणतीही बँक कर्ज देणार नाही आणि दिले तर सर्वाधिक व्याजदर वसुलले जाईल.