
Home Loan Charges | सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं की, चांगलं शिक्षण घेऊन आणि चांगली नोकरी करून स्वबळावर मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काचं घर घ्यावं. अनेकजण स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहेत.
आता घर खरेदी करायचं म्हटलं तर, घरा संबंधीत सर्व कागदपत्रे अचूक असणे अत्यंत गरजेचे. अशातच काही श्रीमंत व्यक्ती पैसे देऊन घर खरेदी करतात परंतु प्रत्येकाकडे एवढे पैसे नसतात आणि म्हणून सर्वसामान्य व्यक्ती होम लोन काढून घर घेण्याचा विचार करतो. घर खरेदीसाठी व्यक्ती बँकेकडून लोन घेतो आणि संबंधित व्यक्तीबरोबर घराची सर्व कागदपत्रे व्यवस्थित पडताळून घर घेण्याची प्रोसेस सुरू करतो. परंतु तुमच्यापैकी फार कमी लोकांना ठाऊक असेल की, घर खरेदी करताना तुमच्याकडून एकूण 5 प्रकारचे चार्जेस घेतले जातात. आता हे चार्जेस नेमके कोणकोणते आहेत पाहूया.
ट्रान्झॅक्शन शुल्क :
तुम्ही बँकेकडून होम लोन घेत असाल तर तुमच्याकडून ट्रान्झॅक्शन शुल्क आकारण्यात येते. मग यामध्ये तुम्हाला लोन मिळो किंवा न मिळो परंतु व्यवहार शुल्क भरावाच लागतो. आपण याला एक प्रकारची एप्लीकेशन फी म्हणू शकतो. त्याचबरोबर ही फी रिफंडेबल नसते. बऱ्याचदा एप्लीकेशन फी भरून देखील तुमचं मत बदलू शकतो. असं झाल्यानंतर एप्लीकेशन फी म्हणजेच व्यवहार शुल्क वेस्ट जातो. त्यामुळे सर्वप्रथम हे सुनिश्चित करा की, तुम्हाला नेमक्या कोणत्या बँकेतून होम लोन घ्यायचे आहे.
कमिटमेंट शुल्क :
NBFC किंवा लोन देणाऱ्या बँका संपूर्ण प्रोसेस मंजूर झाल्यानंतर आणि लोन देण्याची वेळ निश्चित झाल्यानंतर वेळेत लोन फेडलं नाही की, कमिटमेंट शुल्क घेतले जातात. ही एक प्रकारची फी असून, अविकारीत लोनवरच आकारण्यात येते.
मॉर्गेज डीड चार्जेस :
तुमच्याकडून मॉर्गेज डीड चार्जेस होम लोनची निवड करताना आकारण्यात येतात. ही फी होम लोनच्या परसेंटेजनुसार असते. परंतु काही संस्थानं होम लोन आणखीन आकर्षित बनण्यासाठी मॉर्गेज डीड चार्जेस फी वसुलत नाहीत.
प्रीपेमेंट पेनल्टी :
प्रीपेमेंट म्हणजेच लोन पूर्ण करण्यासाठी दिलेल्या काळाआधीच पैसे फेडणे. समजा तुम्ही प्रीपेमेंट केलं तर, बँकांना व्याजदराचे नुकसान सहन करावे लागते. त्या नुकसानाची भरपाई म्हणून बँक तुमच्याकडून प्रीपेमेंट पेनल्टी देखील घेते. हे पेनल्टी चार्ज वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळे असते.
लीगल चार्जेस :
NBFC किंवा बँका होम लोन प्रॉपर्टी संबंधीत सर्व प्रकारची पडताळणी करण्यासाठी बाहेरचे मोठमोठे वकील हायर करतात. वकील हायर केले म्हटल्यावर त्यांना फीस देखील द्यावी लागते. ही फी बँक ग्राहकांकडून वसूलतात. समजा संबंधित प्रॉपर्टीला कायदेशीररित्या परवानगी दिली गेली असेल तर, लीगल चार्जेस घेतले जात नाहीत. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की, तुम्ही जी प्रॉपर्टी पाहत आहात तिच्यावर कोणत्याही प्रकारचे लीगल चार्जेस द्यावे लागतील की नाही, या प्रॉपर्टीवर कोणत्याही प्रकारची अडचण तर नाही ना सर्व गोष्टी पडताळून पहा.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.