9 October 2024 4:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | जबरदस्त कमाई होणार, वेदांता कंपनीबाबत अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ओव्हरसोल्ड झोन जवळ, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांनी दिला सल्ला - Marathi News Jio Finance Share Price | मालामाल करणार जिओ फायनान्शियल शेअर, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News TTML Share Price | 2975% परतावा देणारा TTML शेअर पुन्हा फोकसमध्ये, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - Marathi News Vodafone Idea Share Price | 9 रुपयाचा पेनी शेअर 3 महिन्यात 43% घसरला, पुढे काय, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचे तिकीट बुक करण्याआधी एक काम करा, स्लीपर कोचच्या पैशात AC मधून प्रवास कराल IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर आला फोकसमध्ये, 343% परतावा देणारा स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News
x

Home Loan EMI | होम लोन EMI भरला नाही तर होईल मोठे नुकसान; घर देखील होऊ शकते जप्त - Marathi News

Highlights:

  • Home Loan EMI
  • सिबिल स्कोरवर होतो परिणाम :
  • घर देखील होऊ शकते जप्त :
  • दंड आकारला जाईल :
  • लोन ट्रान्सफरमध्ये घ्यावी लागेल रिस्क :
  • कायदेशीर कारवाई :
  • बँक देईल समाधान :
Home Loan EMI

Home Loan EMI | प्रत्येकालाचा आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं वाटत असतं. अनेकजण घराची स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र एक करून मेहनत घेतात. काही व्यक्ती कॅश पेमेंटवर घर घेतात तर काहीजण होम लोन म्हणजेच ईएमआयवर घर घेणं पसंत करतात. परंतु घराचं ईएमआय भरताना तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात.

सध्याच्या वाढत्या व्याजदराचा आढाव लक्षात घेता आणि इतर आर्थिक समस्यांचा सामना करताना ईएमआय भरून होम लोनचं कर्ज फेडणे थोडेफार कठीण होऊन बसते. त्याचबरोबर तुमच्या घराचा ईएमआय वेळेच्या वेळी भरत राहिला तर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु ईएमआय चुकला की तुम्हाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. आज आम्ही तुम्हाला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेऊन इएमआय चुकणार नाही याबद्दल सांगणार आहोत.

सिबिल स्कोरवर होतो परिणाम :
होम लोन घेतल्यानंतर आणि तुमचा ईएमआय चुकल्यानंतर याचा थेट फटका तुमच्या सिबिल स्कोरला होतो. सिबिल स्कोरचा तीन अंकी नंबर तुमच्या ट्रांजेक्शनवरून मूल्यमापन करतो. यमाई चुकल्यानंतर तुमचा सिबिल स्कोर ढासळू देखील शकतो. या कारणामुळे तुम्हाला भविष्यात पुन्हा कर्ज घेण्याची वेळ आल्यावर कर्ज मिळण्याची संभाव्यता कमी असते.

घर देखील होऊ शकते जप्त :
घराचा हप्ता तुमच्याकडून फेडला गेला नाही तर, तुमचं घर जप्त होण्याची शक्यता असते. घर जप्त होऊन तुम्ही उघड्यावर येऊ शकता. सोबतच आर्थिक आणि भावनिक दृष्ट्या अतिशय खतबल देखील होऊ शकतात. जर तुम्ही वेळेवर ईएमआय भरत नसाल किंवा वेळ निघून जात असेल तर, बँकेला तुमचं घर जप्त करण्याचे अधिकार असतात. यामध्ये बेसिक होम लोनचे सीईओ आणि संस्थापक अतुल मोंगा यांच्या निगराणी खाली बँक तुमचं घर अगदी सहजरित्या जप्त करून पेंटिंग पेमेंट भरून घेऊ शकतात.

दंड आकारला जाईल :
वेळेवर इएमआय भरला गेला नसल्यामुळे तुमच्याकडून इमआयचा छोटा हिस्सा दंड म्हणून घेण्यात येईल. तुम्हाला ही रक्कम सुरुवातीला छोटी वाटू शकते परंतु तुम्ही वारंवार हप्ते चुकवत असाल म्हणजेच इएमआय भरण्यास उशीर करत असाल तर, ही रक्कम हळूहळू वाढत जाते. ज्यामुळे तुम्हाला जास्त नुकसान सहन करावे लागू शकते.

लोन ट्रान्सफरमध्ये घ्यावी लागेल रिस्क :
समजा तुमचं होम लोन चुकलं तर, त्याऐवजी तुम्ही लोन ट्रान्सफरची सुविधा वापरू शकता. परंतु या सुविधेमध्ये जोखीम उचलावी लागेल. कारण की ईएमआय चुकवल्यानंतर नवा क्रेडिटर तुमचा असत्यपणा पाहून तुमची काहीही मदत करणार नाही.

कायदेशीर कारवाई :
वारंवार इएमआय चुकवल्यानंतर तुमच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई देखील केली जाते. कायदेशीर कारवाई होण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेसोबत चांगले संबंध ठेवून पुढील उपायांवर चर्चा करा.

बँक देईल समाधान :
तुम्हाला ईएमआय व्यवस्थित फेटता येत नसेल किंवा काही समस्यांमुळे अडचण निर्माण होत असेल तर, तुम्ही बँकेकडून चांगले सल्ले घेऊन नवीन ईएमआयची पद्धत जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर लोनचा पिरियड टाईम वाढवून देखील घेऊ शकता.

Latest Marathi News | Home Loan EMI 19 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Home Loan EMI(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x