13 December 2024 7:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

Suzlon Vs Inox Share Price | एनर्जी शेअर्स तेजीच्या दिशेने, आयनॉक्स विंड आणि सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत अपडेट, फायदा घ्या

Highlights:

  • Suzlon Vs Inox Share PriceNSE: SUZLON
  • आयनॉक्स विंड आणि सुझलॉन शेअरचा परतावा
  • शेअर्सची 52 आठवड्यांची पातळी – NSE:SUZLON
Suzlon Vs Inox Share Price

Suzlon Vs Inox Share Price | मागील एका वर्षापासून आयनॉक्स विंड आणि सुझलॉन एनर्जी या दोन्ही कंपन्याचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. या दोन्ही कंपन्या पवन ऊर्जेच्या क्षेत्रात व्यवसाय करत आहेत. आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 5 लाख रुपयेपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तर सुझलॉन एनर्जी कंपनीने याच काळात 231 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना एक लाख रुपये गुंतवणुकीवर 3.31 लाख रुपये परतावा दिला आहे.

आयनॉक्स विंड आणि सुझलॉन शेअरचा परतावा
आयनॉक्स विंड कंपनीने परताव्याच्या बाबतीत सुझलॉन एनर्जी कंपनीला मागे टाकले आहे. मागील एका वर्षात आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 408 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर सुझलॉन एनर्जी कंपनीने याच काळात गुंतवणुकदारांना 231 टक्के नफा दिला आहे. एका वर्षांपूर्वी सुझलॉन एनर्जी स्टॉक 24.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आता हा स्टॉक 82 रुपये किमतीवर पोहचला आहे. एका वर्षभरापूर्वी आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स 49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 250 रुपये किमतीवर पोहचला आहे.

आज गुरूवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी आयनॉक्स विंड स्टॉक 5.74 टक्के घसरणीसह 234.38 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तर सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.25 टक्के घसरणीसह 79 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने 2024 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 91 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर सुझलॉन एनर्जी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 2024 मध्ये 112 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शेअर्सची 52 आठवड्यांची पातळी
मागील सहा महिन्यांत आयनॉक्स विंड स्टॉक 115 टक्के वाढला आहे. तर एका महिन्यात हा स्टॉक फक्त 17 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. गेल्या एका महिन्यात सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.25 टक्के मजबूत झाला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 86.04 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 24.50 रुपये होती. आयनॉक्स विंड स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 47.05 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 254.25 रुपये होती.

Latest Marathi News | Suzlon Vs Inox Share Price 19 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Vs Inox Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x