
Joint Home Loan | प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे हक्काचे घर हवे असते. परंतु सर्वांनाच एकर कमी पैसे भरून घर खरेदी करण्यास जमत नाही. अशावेळी बऱ्याच व्यक्ती होम लोनचा पर्याय निवडतात. आपण बऱ्याचदा घरातील कर्त्या पुरुषाच्या नावावरच होम लोन घेतो. परंतु तुम्ही जॉईंट होम लोन घेऊन अनेक लाभांना आमंत्रण देऊ शकता. तुम्ही तुमच्या पत्नीसह जॉईंट होम लोन घेऊन फायदाच फायदा मिळवू शकता. कसा, चला पाहू.
कोणाबरोबर जॉईंट होम लोन घेऊ शकता :
तुम्हाला जॉईंट होम लोनमधून विविध फायदे मिळू शकतात. तसं पाहायला गेलं तर तुम्ही कोणत्याही व्यक्तीबरोबर जॉईंट होम लोन घेऊ शकता परंतु तुम्ही तुमच्या पत्नीच्या किंवा एखाद्या महिलेसह जॉईंट होम लोन घेतलं तर त्याचा दुप्पटीने फायदा तुम्हाला मिळतो. समजा एखाद्या व्यक्तीचं लग्न झालं नसेल तर त्याने त्याच्या आईवडिलांसह जॉईंट होम लोन घेण्याचा विचार करावा.
जॉईंट होम लोनवर टॅक्स सूटचा मिळतो लाभ :
विवाहित पुरुष त्याच्या पत्नीबरोबर जॉईंट होम लोन घेण्याचा विचार करत असेल तर, त्याला टॅक्स सूटचा घवघवीत लाभ मिळतो. म्हणजेच तो टॅक्स बेनिफिटमधून क्लेम करू शकतो. प्री-पेमेंट केल्यानंतर दोघांना सुद्धा 2 लाख रुपयांवर वेगवेगळ्या गोष्टींसाठी टॅक्स सूट मिळतो. एवढेच नाही तर प्रिन्सिपल अमाऊंटवर देखील 1.5 लाख रुपयांची कर सवलत मिळते.
कमी व्याजदरावर मिळेल होम लोन :
NBFC किंवा काही बँका महिलेचे नाव आपल्या कारणाने कमी दराने व्याजदर प्रदान करतात. ज्यामध्ये कमीत कमी 0.05% एवढे कमी व्याजदर असते. तुमच्यासोबत महिलेचे नाव जोडलं असल्यामुळे रजिस्ट्रेशन फी त्याचबरोबर स्टॅम्प ड्युटीवर देखील कमी पैसे घेतले जातात किंवा रीतसर सूट देण्यात येते.
क्रेडिट स्कोर सुधारतो :
तुम्ही जॉईंट होम लोन घेतल्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर सुधारण्यास मदत होते. समजा तुमची पत्नी देखील तुमच्याच बरोबरीने पैसे कमवत असेल तर, तुम्ही दोघं मिळून होम लोनचे EMI लवकरात लवकर फेडून क्रेडिट स्कोरचा उच्चांक गाठू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.