29 April 2024 7:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Money Making Investment | हे आहेत टॉप 5 गुंतवणूक पर्याय जे तुमचे पैसे वेगाने वाढवतात, तुमचा आवडता पर्याय निवडा आणि पैसे गुंतवा

Money Making Investment

Money Making Investment | जर तुम्हाला गुंतवलेले पैसे झटपट दुप्पट करायचे असतील तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. गुंतवणूक बाजारात असे अनेक गुंतवणुकीचे पर्याय आहेत ज्यात गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे सहज दुप्पट होऊ शकतात. परंतु किती वेळ लागेल हे त्या गुंतवणुकीच्या प्रकारावर अवलंबून आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा 5 सर्वोत्तम गुंतवणूक पर्यायांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही काही वर्षांतच पैसे दुप्पट करू शकता.

म्युच्युअल फंड :
गुंतवणूक बाजारात ईएलएसएस/इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम, डेट ओरिएंटेड, इक्विटी ओरिएंटेड, बॅलन्स्ड किंवा हायब्रिड म्युच्युअल फंड यासारखे अनेक म्युच्युअल फंड पर्याय उपलब्ध आहेत. म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखीमीच्या अधीन असते. मात्र यात गुंतवणूक केल्यास तुम्ही जास्त परतावा कमवू शकता. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा दर हा गुंतवणूकदाराने निवडलेल्या म्युचुअल फंडाच्या कालावधीवर अवलंबून असतो. दीर्घकालीन म्युच्युअल फंड वार्षिक सरासरी 12 ते 15 टक्के या दराने परतावा मिळवून देतात. अशा प्रकारे, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून पैसे दुप्पट करण्यासाठी तुम्हाला किमान 5 ते 6 वर्षे लागू शकतात.

शेअर बाजारातील गुंतवणूक :
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो, मात्र यात खूप जोखीम आहे. नेहमीच उच्च परतावा दर मिळेल याची गॅरंटी नाही. मागील काही दशकात शेअर बाजारातून मिळणारा वार्षिक परतावा दर 15 टक्केच्या आसपास राहिला आहे. ब्लू चिप कंपन्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही 3 ते 5 टक्के वार्षिक परतावा कमवू शकता. या दराने तुमचे पैसे दुप्पट होण्यास थोडा वेळ लागेल. विना जोखीम गुंतवणूक करून चांगला परतवा कमावण्यासाठी शेअर बाजाराचे सखोल ज्ञान असणे खूप गरजेचे आहे.

गोल्ड ईटीएफ :
गोल्ड ETF ही सोन्यात डिजिटल रूपाने गुंतवणूक करण्याचा पर्याय देते. सोने हा भारतीयांचा गुंतवणुकीचा आवडता पर्याय आहे. आपण सोन्यात अनेक प्रकारे गुंतवणूक करू शकतो. यापैकी गुंतवणूक पर्याय म्हणजे गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड/ETF आहे. 2002 साली गोल्ड ETF भारतात पहिल्यांदा लॉन्च करण्यात आला होता. गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करणे हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग मानला जातो. हा गुंतवणूक पर्याय वार्षिक 22 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. शेअर बाजारातील जोखीम आणि अस्थिरतेमुळे जर तुम्ही गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक केली तर 5 वर्षांच्या कालावधीत तुम्ही 22 टक्के CAGR दराने नफा कमवू शकता. याचा अर्थ गोल्ड ETF मध्ये तुमचे गुंतवलेले पैसे 3 ते 4 वर्षांत सहज दुप्पट होऊ शकतात.

बँक एफडी योजना :
बँक एफडी हा गुंतवणूक पर्याय बँकांद्वारे दीर्घकाळासाठी ऑफर केला जाणारा सुरक्षित गुंतवणुक पर्याय आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतेच व्याजदर अपरिवर्तित ठेवले आहेत. एफडीवरील व्याजदर मागील काही वर्षांत कमी झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही बँकेच्या एफडी मध्ये गुंतवणूक करून पैसे दुप्पट होण्यासाठी 8 ते 9 वर्षे लागू शकतात.

कॉर्पोरेट ठेवी/परिवर्तनीय डिबेंचर :
गुंतवणुक बाजारात पैसे लावून दुप्पट करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहे, मात्र ते आपल्याला निवडता आले पाहिजे. असाचेक पर्याय म्हणजे कॉर्पोरेट ठेवी किंवा परिवर्तनीय डिबेंचर. नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या आणि बँकांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा तुम्ही नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर आणि कॉर्पोरेट ठेवींमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतवा कमवू शकता. ICRA रेटिंग आणि ठेवीच्या कालावधीनुसार या नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर आणि कॉर्पोरेट ठेवींमध्ये परताव्याचा दर 9 ते 10 टक्के पर्यंत असू शकतो. अशा योजनांमध्ये गुंतवलेले पैसे दुप्पट वाढण्यासाठी किमान 8 वर्षे लागतात. कॉर्पोरेट ठेवी उद्योग करणाऱ्या कंपन्या ऑफर करतात तर दुसरीकडे NCDs NBFC सह कॉर्पोरेट कंपन्यांद्वारे जारी केले जातात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Top 5 Money Making Investment Scheme and investment opportunities to double money in short time in 10 November 2022.

हॅशटॅग्स

Money Making Investment(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x