Raghav Productivity Enhancers Share Price Today | मालामाल करणारा शेअर, 870 टक्के दिला परतावा, स्टॉक डिटेल्स पाहा
Raghav Productivity Enhancers Share Price Today | शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक नवीन स्टॉक सामील केला आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स’. ही कंपनी मुख्यतः भांडवली वस्तू क्षेत्रात व्यापार करणारी एक स्मॉल कॅप कंपनी आहे. रेखा झुनझुनवाला यांनी मार्च 2023 तिमाहीमध्ये ‘राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स’ कंपनीचे 5.23 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. (Raghav Productivity Enhancers Limited)
बऱ्याच काळानंतर रेखा झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवीन शेअर सामील केला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार आशिष कचोलिया आणि मुकुल अग्रवाल यांनी देखील ‘राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स’ कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले आहेत.
5 वर्षात दिला 870 टक्के परतावा :
‘राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. मागील 5 वर्षात ‘राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 869.15 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 276 टक्के वाढली आहे. तर मागील 1 वर्षात शेअरची किंमत 59.41 टक्के वाढली आहे. रेखा झुनझुनवालाच्या पोर्टफोलिओमध्ये सामील झाल्यानंतर हा स्टॉक 4 टक्क्यांनी वाढला असून 899.90 रुपयांवर पोहचला आहे. आज मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.06 टक्के वाढीसह 899.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक :
रेखा झुनझुनवाला यांनी ‘राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स’ कंपनीचे 6 लाख शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडले आहे. या शेअरचे एकूण मूल्य 54 कोटी रुपये आहे. कंपनीमधील एकूण 5.2 टक्के भाग भांडवल रेखा झुनझुनवाला यांनी होल्ड केले आहेत. दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी देखील ‘राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स’ कंपनीचे 2 टक्के म्हणजेच 231,683 शेअर्स खरेदी केले आहेत. मुकुल अग्रवाल यांनी ‘राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स’ कंपनीचे 1.6 टक्के म्हणजेच 178,074 शेअर्स होल्ड केले आहेत. राघव प्रोडक्टिविटी ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रोड्स आणि रेफ्रेक्ट्रीज बनवण्याचे काम करते. 2009 पासून ही कंपनी व्यवसाय करत असून जयपूर, राजस्थान या ठिकाणी स्थित आहे.
टायटन कंपनीतही गुंतवणूक केली :
रेखा झुनझुनवाला यांनी मागील तिमाहीत टायटन कंपनीचे 0.1 टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. हा कंपनीमध्ये त्यांनी एकूण 5.3 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. सध्या त्याच्या पोर्टफोलिओमध्ये टायटन कंपनीचे एकूण 46,945,970 शेअर्स असून त्याचे सध्याचे बाजार मूल्य 12,155.7 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Raghav Productivity Enhancers Share Price Today on 18 April 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट